French Farmers Protest In Paris: युरोपियन युनियन दक्षिण अमेरिकेतील देशांशी करणार असलेल्या मुक्त व्यापार कराराच्या विरोधात (Mercosur trade deal) फ्रान्समधील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. फ्रान्समधील शेतकऱ्यांनी गुरुवारी ट्रॅक्टरसह येऊन पॅरिस शहरातील रस्ते तसेच आर्क डी ट्रायम्फ सारखी प्रमुख ठिकाणे अडवून वाहतूक ठप्प केली. .दक्षिण अमेरिकेतील पाच देशांचा व्यापारी गट असलेल्या 'मर्कोसूर'सोबतच्या नियोजित मुक्त व्यापार करारामुळे युरोपियन युनियनमध्ये स्वस्त खाद्यपदार्थांची आयात मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी भीती व्यक्त करत उजव्या विचारसरणीच्या 'कोऑर्डिनेशन रुराले' शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार गुरुवारी पहाटेच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरसह पॅरिस शहरात धडक दिली. काही शेतकऱ्यांनी आयफेल टॉवर जवळ तर काही आर्क आर्क डी ट्रायम्फ जवळ ट्रॅक्टर उभे केले..फ्रान्समधील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून ब्राझील, अर्जेंटिना, बोलिव्हिया, पॅराग्वे आणि उरुग्वे यांचा समावेश असलेल्या 'मर्कोसूर' देशांशी होणाऱ्या व्यापार कराराला विरोध करत आहेत. या करारामुळे फ्रान्समधील शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. .एका ट्रॅक्टरवर 'नो टू मर्कोसूर' असा संदेश लिहिलेला होता. तसेच त्यांनी वाढता उत्पादन खर्च आणि अतिरिक्त स्थानिक नियमाांच्या विरोधातही आंदोलन केले..Swabhimani Shetkari Sanghtana Protest: बेदाणा आयातप्रकरणी स्वाभिमानी संघटनेचा मोर्चा.सकाळच्या गर्दीच्या आधीच्या पॅरिसकडे जाणाऱ्या महामार्गांवर शेतकऱ्यांनी डझनभर ट्रॅक्टर आणून उभे केले. यामुळे वाहतूक ठप्प झाली. या आंदोलनामुळे सुमारे १५० किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली, अशी माहिती वाहतूक मंत्र्यांनी दिली. .Shaktipeeth Highway Protest: दहा जिल्ह्यांतील शेतकरी ‘शक्तिपीठ’विरोधात एकवटणार.या शेतकरी आंदोलनामुळे त्यांच्या सरकारवरचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. युरोपियन युनियनच्या सदस्य देशांकडून या मुक्त व्यापार करारावर मतदान होण्याच्या अवघ्या एक दिवसआधी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. संसदेत स्पष्ट बहुमत नसल्यामुळे मॅक्रॉन यांच्याकडून कोणतीही धोरणात्मक चूक झाल्यास, ती सभागृहात अविश्वास ठरावाला कारणीभूत ठरू शकते, असे सांगण्यात आले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.