Shivraj Singh Chauhan : "पूर्णपणे शेतकरीभिमुख कामांवर लक्ष केंद्रित करा" : शिवराजसिंह चौहान यांच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश

Agriculture Minister Shivraj Singh Chauhan : शिवराजसिंह चौहान यांनी कृषिमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
Shivraj Singh Chauhan
Shivraj Singh ChauhanAgrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (ता.११) कृषिमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्याचक्षणी त्यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक घेत कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर बुधवारी (ता.१२) शिवराजसिंह यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात करतानाच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी शिवराजसिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिल्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यावर चर्चा केली. यावेळी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर, भगीरथ चौधरी, कृषी सचिव मनोज आहुजा, कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव (डीएआरई) आणि भारतीय परिषदेचे महासंचालक उपस्थित होते. कृषी संशोधन (आयसीएआर) डॉ. हिमांशू पाठकही उपस्थित होते.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात शिवराजसिंह यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे कृषी मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. कृषिमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच शिवराजसिंह ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. देशभरातील कृषी उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी दर्जेदार बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यावर भर देण्याचे निर्देश शिवराजसिंह यांनी बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Shivraj Singh Chauhan
Shivraj Singh Chauhan : केंद्रीय कृषीमंत्री होताच शिवराजसिंह यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

तसेच देशातील शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार गतीने कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले संपूर्ण लक्ष शेतकरीभिमुख कामांवर केंद्रित करावे अशाही सूचना शिवराजसिंह यांनी केल्या.

Shivraj Singh Chauhan
Shivraj Singh Chauhan : मध्य प्रदेशात शिवराजसिंह मुख्यमंत्रिपदाचा ‘चेहरा’ नकोत

काय केल्या सूचना?

पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासासाठी वेगाने कामे करता यावीत यासाठी संपूर्ण लक्ष शेतकरीभिमुख योजना आणि कामांवर द्यावे, असे शिवराजसिंह यांनी म्हटले आहे. तर मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यातील सर्व बाबी समजून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

देशातील कृषी क्षेत्राला बळकटी देण्याबरोबरच शेतकऱ्यांचे दु:ख कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देशही शिवराजसिंह यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार खते, बियाणांची उपलब्धता प्राधान्याने करण्यात यावी. याबाबत त्यांना कोणतीही अडचण येऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात यावी असेही शिवराजसिंह यांनी म्हटले आहे. देशात कृषी उत्पादन आणि उत्पादकता वाढवताना देशांतर्गत गरजा भागवण्याबरोबरच एक ठोस कृती आराखडाही राबवण्याची गरज आहे. जेणेकरून गरजेनुसार दर्जेदार कृषी उत्पादने जगातील इतर देशांमध्ये निर्यात करता येतील, यावर शिवराजसिंह यांनी बैठकीत भर दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com