Solapur News: सोलापूरच्या बाजार समितीत तुरीची आवक वाढली आहे. मात्र, राज्य सरकारकडून हमीभावाने तूर खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याबाबत अद्याप आदेश आले नाहीत. खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १,२०० - १,८०० रुपये कमी दराने तुरीची विक्री करावी लागत आहे. तुरीसाठी केंद्र सरकारने प्रतिक्विंटल ८,००० रुपये हमीभाव जाहीर केला आहे..सोलापूर जिल्ह्यासह राज्यात तूर काढणीला सुरवात होऊनही अद्याप आवक सुरू न झाल्याच्या नावाखाली राज्य सरकारने तूर हमीभाव केंद्र सुरू करण्याबाबत आदेश दिले नाहीत. आता सोलापूरच्या बाजार समितीत दोन हजार क्विंटलहून अधिक तुरीची आवक होऊ लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची विक्री करावी लागत आहे. खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद खरेदीसाठीही विलंबाने सात केंद्र सुरू केले. तोपर्यंत अतिवृष्टीतून वाचलेल्या शेतमालाची विक्री झाली होती. शिवाय पावसामुळे मालाची प्रत घसरल्यानेही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. परिणामी जिल्ह्यात हमीभाव केंद्र सुरू होऊनही सोयाबीन, मूग व उडीद उत्पादक शेतकरी केंद्रांकडे फिरकला नाही..Tur Procurement: आंध्र प्रदेशात तुरीची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी.हमीभावात वाढ, मात्र लाभ नाहीकेंद्र सरकारने यंदाच्या खरीप हंगामातील शेतमालांच्या हमीभावात वाढ केली. मात्र, विलंबाने खरेदीमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नसल्याची स्थिती आहे. केंद्राने गतवर्षाच्या तुलनेत २०२५-२६ च्या खरीप पिकांच्या हमीभावात प्रतिक्विंटल सोयाबीनसाठी ४३६, मूग ८६, उडीद ४०० तर तुरीसाठी ४५० रुपयांची वाढ केली. मात्र, जिल्ह्यातील हमीभाव केंद्रांवर मूग विक्रीसाठी नोंदणीच झाली नाही. तर उशिरा केंद्र सुरू केल्याने खूपच कमी सोयाबीन व उडीद खरेदी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आता तूर उत्पादकांचीही तीच गत होण्याची चिन्हे आहेत..जिल्ह्यातील हमीभावाने सोयाबीन खरेदी स्थितीसोयाबीनचे सरासरी पेरणी क्षेत्र ः ८१,२७० हेक्टरसोयाबीन पेरणी ः १,३५,८९० हेक्टरहमीभाव केंद्र ः ०७नोंदणी केलेले शेतकरी ः १७३८संदेश मिळालेले शेतकरी ः ६०३माल विकलेले शेतकरी ः ५०३एकूण खरेदी ः १०,७६४ क्विंटलएकूण खरेदी किंमत ः ५,७३,५०,५९२ रुपये.Tur Procurement: तूर खरेदीला सरकारकडून २८ मेपर्यंत मुदतवाढ.जिल्ह्यातील हमीभावानेउडीद खरेदी स्थितीउडीद चे सरासरी पेरणी क्षेत्र ः ५८,१६६ हेक्टरउडीदची पेरणी ः १,०७,५३२ हेक्टरहमीभाव केंद्र ः ०७नोंदणी केलेले शेतकरी ः ७२६संदेश मिळालेले शेतकरी ः ३३८माल विकलेले शेतकरी ः १६४एकूण खरेदी ः १,५६९.५०एकूण खरेदी किंमत ः १,२२,४२,१०० रुपये.जिल्ह्यातील तूर पिकाची स्थिती जिल्ह्यातील सरासरी पेरणी क्षेत्र८६,५८३ हेक्टरजिल्ह्यात प्रत्यक्ष पेरणी८५,४८६ हेक्टरतुरीची बाजारातील आवक२,३५४ क्विंटलप्रतिक्विंटल दर६,१७५- ६७६६ रुपये.सोयाबीन, उडीद खरेदीसाठी सात केंद्र सुरू आहेत. त्या केंद्रांवरच तूर खरेदीही होणार आहे. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप केंद्र सुरू करण्याबाबत कोणतेच आदेश नाहीत. दोन - चार दिवसांत त्याबाबत आदेश मिळण्याची शक्यता आहे.- मनोज वाजपेयी, जिल्हा पणन अधिकारी, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.