MP Prataprao Jadhav : बचत गटांसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करणार : खासदार जाधव

Buldana News : बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर लवकरच ६० लाख रुपये किमतीचे कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू केले जाणार आहे.
MP Prataprao Jadhav
MP Prataprao Jadhav Agrowon

Chikhali News : बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर लवकरच ६० लाख रुपये किमतीचे कॉमन फॅसिलिटी सेंटर सुरू केले जाणार आहे. समूहांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ मिळावी यासाठी तालुक्यात विक्री केंद्र उभारण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ तसेच ही उत्पादने विविध विक्री माध्यमांवरही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन खासदार प्रतापराव जाधव (MP Prataprao Jadhav) यांनी केले.

MP Prataprao Jadhav
MP Dr. Jayasiddheshwar Sivacharya Mahaswami : सोलापूर तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून घोषित करा

येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत महिला स्वयंसाह्यता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विपणन, मार्गदर्शन व बँक कर्ज वाटप मेळावा खासदार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी बँक कर्ज, मंजूर निधीतून करता येणारे व्यवसाय, अभियानाचे पुढील नियोजन तसेच विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीबाबत मार्गदर्शन केले.

खासदार जाधव पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना जिल्हा पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी मॉल उभारण्याचे नियोजन केले आहे. त्याच उत्पादनांचा जिल्ह्यासाठी एकच ब्रँड ही संकल्पना अस्तित्वात आणली जाईल.’’

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवाजी देशमुख, गजानन मोरे, शहरप्रमुख विलास घोलप, वसंत गाडेकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भारसाकळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक नितीन मेश्राम, पंचायत समितीच्या वंदना सुरडकर, तालुका व्यवस्थापक सारिका जाधव, नीता भाले, रूपाली पानझाडे, पूजा सुरडकर, रवींद्र मोळवणे, गणेश खरात, भास्कर आंभोरे व इतर उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com