Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Project : ‘भंडारदरा’, ‘मुळा’मध्ये अडीच टीएमसी पाणी जमा

Rain Update : अतिपावसामुळे भंडारदरा, मुळा धरणात एका दिवसात प्रत्येकी तब्बल सव्वा टीएमसी पाणी जमा झाले आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात बुधवारी (ता. २४) सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. अकोले तालुक्यातील रतनवाडी, पांजरे, घाटघर येथे २४ तासांत विक्रमी पाऊस झाला. अतिपावसामुळे भंडारदरा, मुळा धरणात एका दिवसात प्रत्येकी तब्बल सव्वा टीएमसी पाणी जमा झाले आहे.

गुरुवारी (ता. २५) सकाळी सहा वाजता भंडारदरा ७६ टक्के, तर मुळा ४५ टक्के भरले. ‘मुळा’मध्ये २९ हजार ५०० क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. निळवंडे ३५ टक्क्याच्या पुढे गेले आहे. दरम्यान, पाण्याची मोठी आवक सुरू असल्याने दुपारी बारा वाजता भंडारदरा धरणातून ८३५ क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू केला आहे.

बुधवारी सायंकाळपासून जिल्हाभर संततधार सुरू आहे. अकोले तालुक्यातील पश्‍चिम भागात मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोटात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. प्रशासनाकडील नोंदीनुसार घाटघरला ३५५ मिलिमीटर, रतनवाडीला ३२६, पांजरे येथे ३१५, भंडारदरा येथे १८० मिलिमीटर, निळवंडे येथे ८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भंडारदरा आणि मुळा धरणात एका दिवसात तब्बल सव्वा टीएमसी पाणी जमा झाले.

मुळा नदीत बुधवारपासून सुमारे २९ हजार ५०० क्युसेकने पाणी येत आहे. मुळा धरणात गुरुवारी सकाळी सहा वाजता पाणीसाठा ४५ टक्के झाला. भंडारदरा धरण ७६ टक्के भरले. असाच पाऊस राहिला तर चार दिवसांत भंडारदऱ्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागू शकतो. निवंडेतही अधिक पाणी जमा झाल्याने निळवंडे ३५ टक्क्यांवर भरले आहे. पुण्यातील पावसामुळे सिद्धटेक येथे दौंड पुलाजवळ भीमा नदीतून ४५ हजार ७३० क्युसेकने पाणी उजनी धरणात जात होते.

नांदूर मधमेश्‍वर बंधाऱ्यातून विसर्ग सुरू

नाशिकमधील पावसामुळे नांदूर मधमेश्‍वर बंधाऱ्यातून विसर्ग सुरू केला आहे. गुरुवारी सकाळी ८ हजार ८०८ क्युसेकने पाणी सोडले गेले. दुपारी बारा वाजता भंडारदरा धरणातून ८३५ क्युसेकने प्रवरा नदीत विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात रात्रभर भीज व दमदार पाऊस झाला. पारनेर, वडझिरे या मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT