Water Project : मराठवाड्यातील ९३ लघू- मध्यम प्रकल्प कोरडे

Water Stock : मराठवाड्यातील ७५० लघू व ७५ माध्यम प्रकल्पांपैकी ९३ लघू- मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. याशिवाय ४१७ लघू- मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
Water Project
Water Project Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील ७५० लघू व ७५ माध्यम प्रकल्पांपैकी ९३ लघू- मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. याशिवाय ४१७ लघू- मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

यंदा पाऊस काळ चांगला राहणार असा अंदाज सुरुवातीला आला. त्यामुळे सुरुवात चांगली झालेला पाऊस मराठवाड्यातील लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांची तहान झपाट्याने भागवेल असे वाटत होते. परंतु जून संपत आला असताना मराठवाड्यातील प्रकल्पांची स्थिती सुधारण्याचे नाव घेत नाहीय.

Water Project
Dam Water Stock : महिनाभरातच धरणांत १६.४१ टीएमसी पाण्याचा येवा

कुठे भरपूर तर कुठे अपेक्षितही नाही असे पावसाचे प्रमाण आहे. मराठवाड्यातील ७५० लघू प्रकल्पांपैकी ८७ प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ३२ प्रकल्प बीड जिल्ह्यातील असून, त्या पाठोपाठ धाराशिवमधील २१, छत्रपती संभाजीनगरमधील १८, जालन्यातील १३ व लातूरमधील तीन प्रकल्पांचा समावेश आहे.

याशिवाय ६ मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून, त्यामध्ये बीडमधील सर्वाधिक ४, त्यापाठोपाठ जालना व धाराशिवमधील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. ४१७ लघू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये ३७८ लघू व ३९ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

Water Project
Dry Water Projects : गिरणा पट्ट्यातील अनेक प्रकल्प कोरडे

जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या ३७८ लघू प्रकल्पात लातूरमधील ८४, धाराशिवमधील ८१, बीडमधील ६७, जालन्यातील ३९, छत्रपती संभाजीनगरमधील ३६, नांदेडमधील ३३ व परभणी, हिंगोली येथील प्रत्येकी १९ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या ३९ माध्यम प्रकल्पात छत्रपती संभाजीनगर व धाराशिव मधील प्रत्येकी ११, बीडमधील ६, जालन्यातील ५, लातूरमधील ३, परभणीतील २ व नांदेडमधील एका प्रकल्पाचा समावेश आहे. पावसाळा अजून बाकी आहे. परंतु प्रकल्पांची आत्ताची स्थिती चिंता वाढविणारी आहे.

उपयुक्त पाणीसाठा अकरा टक्क्यांवर

मराठवाड्यातील सर्व ८७७ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा आताच्या घडीला ११.४० टक्क्यांवर आला आहे. मोठ्या ११ प्रकल्पांमध्ये १२.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ माध्यम प्रकल्पांत सर्वांत कमी ६.३७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, ७४९ लघू प्रकल्पात केवळ ८.१५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ११.६५ टक्के तेरणा, मांजरा रेणा नदीवरील बंधाऱ्यात ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com