Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : उमरगा, लोहारा तालुक्यांतील बारा तलाव कोरडे

Water Shortage : गत पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने उमरगा, लोहारा तालुक्यातील ४५ सिंचन प्रकल्पापैकी एकाही प्रकल्पात मुबलक जलसाठा शिल्लक राहिला नाही.

Team Agrowon

Dharashiv News : गत पावसाळ्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प झाल्याने उमरगा, लोहारा तालुक्यातील ४५ सिंचन प्रकल्पापैकी एकाही प्रकल्पात मुबलक जलसाठा शिल्लक राहिला नाही. १६ प्रकल्पांतील पाणीसाठा जोता पातळीखाली आहे. तर बारा तलाव कोरडेठाक पडले आहेत. प्रकल्पात जलसाठा नसल्याने पिके घेणे शक्य होत नाही.

उमरगा तालुक्याने अवर्षण स्थिती अनेक वेळा अनुभवली आहे. शेतजमिनीचे सर्वाधिक क्षेत्र कोरडवाहू आहे. निसर्गाचा फटका बसल्याने खरीप हंगामातील पिकाचे उत्पन्न घटले. रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. पाण्याच्या कमी उपलब्धतेमुळे पिकांचे उत्पन्नही कमालीचे घटले.

दरम्यान, सिंचन प्रकल्पात पाणीसाठा नसल्याने, शिवाय काही मोजक्याच तलावात असलेला पाणीसाठाही राखीव ठेवल्याने शेतीसाठी पाणी मिळणे कठीण झाल्याने ओलिताखालील क्षेत्र धोक्यात आले आहेत. तलावच कोरडेठाक पडल्याने परिसरातील पाणी स्त्रोत्रही कोरडे पडत आहेत. परिणाणी कांही गावांना तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे.

१६ तलावांतील पाणीसाठा  जोता पातळी खाली 

तालुक्यातील काही मोजक्यात तलावात जेमतेम पाणीसाठा आहे. दसलक्ष घन मीटरप्रमाणे पाणीसाठा असलेले तलाव पुढीलप्रमाणे : सरोडी (.०६९), भिकार सांगवी (३.५२५), केसरजळगा साठवण तलाव क्रमांक एक (०.२१४), केसरजळगा साठवण तलाव क्रमांक दोन (०.१०३), कसगी (.०२८), कदेर (.०३१), तुरोरी ( o.१२५),

कोळसुर (२.९५२), कुन्हाळी (.०२८), कसमलवाडी  (.०२६), तलमोडवाडी (.२२८), दगडधानोरा (५.५२१), बेन्नीतुरा (१.०९४), अचलेर (.४७३). दरम्यान आलुर, धानुरी, लोहारा लघुपाटबंधारे तलाव, आलुर, माळेगाव, हिप्परगारवा, नारंगवाडी, पेठसांगवी, एकूरगा, वागदरी, गुंजोटी, डिग्गी, दाळींब, कोरेगाव, रामनगर या साठवण तलावासह जकापूर मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोता पातळी खाली आला आहे

बारा तलाव कोरडेठाक

उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी, सुपतगाव, भुसणी, मुरळी, काळानिंबाळा, बलसूर क्रमांक एक व दोन, कोराळ, गुंजोटीवाडी, मुरळी या तलावासह लोहारा तालुक्यातील जेवळी क्रमांक एक व दोन व भोसगा तलाव कोरडेठाक पडले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT