Water Crisis : मराठ्यवाड्याची चिंता वाढली! जायकवाडी धरणातून पिकाला पाणी नाही?

Jayakwadi Dam : राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील उजनी धरणातील जीवंत पाणी साठा संपल्या माहिती आठवड्याच्या आधी आली होती. यामुळे सोलापूर आणि अहमदनगरची चिंता वाढली होती. यादरम्यान अजून मे महिना लांब असतानाच मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट घोंगावत असल्याची माहिती मिळत आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा अंत काही होताना दिसत नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामुळे शेतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यादरम्यान जानेवारी २२ तारखेला उजणी धरणातील पाणी साठ्याबाबत माहिती समोर आली होती. यानंतर आता जायकवाडी धरणाबाबत चिंचा वाढवणारी बातमी येत आहे. जायकवाडी धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. ज्यामुळे आधीच दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीमधील सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्र जायकवाडी धरणावर अवलंबून आहेत. तर जालना, छत्रपती संभाजीनगर या शहरांसह अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना देखील याच धरणावर आहेत. मात्र आता धरणातील पाणी साठाच कमी झाल्याने यंदा पिकांसाठी उन्हाळी आवर्तन सोडले जाणार नाही. तर सध्याचा शिल्लक साठा हा फक्त पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. याबाबत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) प्रशासकांनी निर्णय घेतला आहे.

Water Crisis
Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात आवक वाढली, पाणीसाठा पोहोचला ४४ टक्क्यांवर

सुमारे ४० टक्के पाणीसाठा शिल्लक

जायकवाडी प्रकल्पातून शेती, पिण्याच्या पाण्यासह छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील विविध औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा होतो. यंदा मात्र कमी पाऊस झाल्याने धरणात ५२ टक्के पाणी जमा झाले होते. पण आता मे महिन्याच्याआधी ३८.४२ पाणी साठा शिल्लक राहीला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने उन्हाळी आवर्तन न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Water Crisis
Ujani Dam Water : उजनी धरणातील पाण्याच्या संरक्षणासाठी धरणग्रस्त करणार आंदोलन

मराठवाड्याला पाणी

दरम्यान मराठवाड्याला पाणी मिळावे यासाठी मध्यंतरी जोरदार आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील विविध धरणांतून समन्यायी पाणी वाटप तत्त्वानुसार पाणी मिळावे यासाठी करण्यात आले होते. ज्यानंतर मराठवाड्याला ८ टीएमसी पाणी देण्यात आले होते.

दरवर्षी ४ आवर्तने मात्र आता नाही

दरवर्षी जायकवाडी धरणातून शेतीसाठी ४ आवर्तने सोडली जातात. तर यंदाच्या रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे सध्या एक आवर्तन सोडले असून ते २६ जानेवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र आता धरणात ४० टक्के देखील पाणीसाठा शिल्लक नसल्याने उन्हाळी पिकासाठी पाणी दिले जाणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com