Ghodegaon News: भीमाशंकरच्या आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी आदिवासी विकास विभागाने खरेदी करून आश्रमशाळेतील मुलांना दैनंदिन आहारात दिली आहे. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी पुढाकार घेऊन हा अभिनव कार्यक्रम सुरू केला आहे.
आदिवासी विकास विभागाने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील ५५ शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी व साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले आहे. यातून शेतकऱ्यांनी संपूर्ण संद्रिय स्ट्रॉबेरी पिकवली आहे. ही पिकवलेली स्ट्रॉबेरी शेतकरी भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विकतात किंवा पुणे, मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये पाठवत आहेत.
तर प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांना, ही स्ट्रॉबेरी आपण खरेदी करून आश्रमशाळेतील मुलांच्या दैनंदिन आहारात देऊ अशी कल्पना सुचली. त्यांनी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना कळवून घोडेगाव येथे सुरू असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहात स्ट्रॉबेरी आणून द्या, या ठिकाणी वजन करून लगेच पैसे घेऊन जा, असे आवाहन केले.
याला बोरघर परिसरात शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवषी २५ किलो स्ट्रॉबेरी जमा झाली. या ठिकाणी वजन करून २३० रुपये किलोप्रमाणे त्यांना पैसे देण्यात आले. या वेळी सहायक प्रकल्प अधिकरी सोनुल कोतवाल, अधीक्षक विपुल टकले, समाजसेविका जनाबाई उगले हे उपस्थित होते.
प्रकल्प अधिकारी देसाई म्हणाले, ‘‘आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी आदिवासी मुलांच्या आहारात असावी आणि शेतकऱ्यांना जागेवरच चांगले दर मिळावे या उद्देशाने खरेदी केली. याला शेतकरी देखील चांगला प्रतिसाद देत आहेत. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढाकार घेऊन ही योजना सुरू करायला लावली व याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे,
स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी संतोष शेळके व जनाबाई उगले म्हणाल्या, ‘‘संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली स्ट्रॉबेरी आज आमच्याच मुलांना खायला मिळत आहे. राज्याचे माजी मंत्री वळसे पाटील व प्रकल्प अधिकारी देसाई यांनी सुरू केलेली योजना शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.