Jalgaon News : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत भूमिअभिलेख विभागाला रोवर युनिट मशिनची गरज आहे. अनेक भागांत अद्यापही या रोवरद्वारे जमीन मोजणी होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे या यनिटची संख्या वाढविण्याची मागणी आहे. .रोवरमुळे शेत जमीन मोजणी तसेच गावठाण भूखंड वाटप, पुनर्वसन भूखंड वाटप याद्वारे दिल्या जाणाऱ्या भूखंडाची तत्काळ मोजणी करता येऊन जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रियादेखील अधिक जलदगतीने होते. परंतु या यंत्रणेबाबत प्रशासनही उदासीन आहे. .Rover Technology : भूकरमापकांना मोजणीसाठी रोव्हर यंत्रणा पुरविणार.अनेक शेतकरी रोवरने मोजणीची मागणी करतात. परंतु त्यांना त्याबाबत सहकार्य केले जात नाही. बांधावरून भावकीचे आपापसांत वाद सुरू असतात. परंतु आता या यंत्रामुळे जमिनीचे मोजमाप करण्यासाठी लागणारा वेळ आता लागणार नाही. .भूमिअभिलेख विभागाला प्राप्त झालेल्या या रोवर युनिट मशिनमुळे जमीन मोजणी अधिक जलदगतीने होणार असून शेतकऱ्यांना व प्रशासनाला मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे रोवरची संख्या, त्याची हाताळणी, मोजणीत अचूकता याबाबत प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे..Rover Machines: शासनाकडून बाराशे रोव्हर खरेदीस मान्यता.सर्वत्र एकाच वेळी शासकीय मोजणी व्हावीशासकीय शेतमोजणी करून अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. ब्रिटिशकाळात शासकीय शेतमोजणी झाली होती. यानंतर शेतांत अतिक्रमण, बांध फोडणे, नाल्यांचे मार्ग बदलणे किंवा नाले बद करणे, पावसाचे पाणी वळविणे असे प्रकार झाले आहेत. याचाही फटका अनेक शेतकऱ्यांना बसतो. .अनेकांकचे सातबारा उताऱ्यावर नमूद क्षेत्र व प्रत्यक्षात कसले जाणारे क्षेत्र यात तफावत आहे. कारण अतिक्रमणाची समस्या आहे. शासन जसे शेतरस्त्यांसाठी नवनवे आदेश जारी करीत आहे, तशी सर्व शेतकऱ्यांची, सर्व शिवारांत एकाच वेळी शासकीय शेतमोजणी करून न्याय दिला जावा, अशी मागणी केली जात आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.