Kolhapur News : ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्ह्यातून एक अभिनव आणि राज्यात पहिलीच असणारी ‘मकान-किराणा’ योजना सुरू करण्यात येत आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने २०२५-२६ या आर्थिक वर्षात सुरू होणाऱ्या या योजनेअंतर्गत, महिलांना केवळ पक्के घरकुलच मिळणार नाही, तर स्वतःचा किराणा व्यवसाय सुरू करण्यासाठी थेट ३०,००० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाणार आहे. .यामुळे महिलांना घर आणि रोजगार अशा दोन्हीचा लाभ एकाच वेळी मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली. ते म्हणाले, की, ही योजना फक्त घरकुलापुरती मर्यादित नसून, ती ग्रामीण महिलांसाठी उत्पन्नाचा एक स्थिर स्रोत निर्माण करेल..Women Empowerment : नाबार्ड सहलीतून महिलांच्या शेतीविषयक ज्ञानात भर .यामुळे महिलांची आर्थिक अडचण दूर होऊन, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या समाजाच्या मुख्य प्रवाहात सक्रियपणे सहभागी होतील. ‘घर, चूल आणि रोजगाराचा आधार’ देणारी ही योजना ग्रामीण महिलांच्या जीवनात नवा अध्याय सुरू करेल. .Women Empowerment: महिला होणार आत्मनिर्भर; महिला पतसंस्थांद्वारे क्रांती.या योजनेची अंमलबजावणी करताना, २०२४-२५ आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या ६५ हजार घरकुलांपैकी ५० हजार घरकुले ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. यापैकी २५ हजार घरांना ‘पंतप्रधान सूर्यघर योजने’चा लाभदेखील दिला जाणार आहे.=.योजनेचे निकषदारिद्र्यरेषेखालील महिलांना योजनेत प्राधान्य दिले जाईल.घरकुल हे महिलेच्या नावावर असणे बंधनकारक आहे.घरकुल १०० टक्के पूर्ण झाल्यानंतरच व्यवसायासाठी आर्थिक मदत दिली जाईल.लाभार्थी महिलेने मिळालेल्या मदतीतून सुरू केलेला किराणा दुकानाचा व्यवसाय किमान तीन वर्षे करणे आवश्यक आहे.दुकान सुरू केल्याचे गटविकास अधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र घेणे अनिवार्य आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.