Strawberry Cultivation : महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात

Strawberry Farming : महाबळेश्वर, जावळी तालुक्यांत स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. लागवडीस अति पावसाचा फटका बसला आहे.
Strawberry Cultivation
Strawberry CultivationAgrowon
Published on
Updated on

Satara News : महाबळेश्वर, जावळी तालुक्यांत स्ट्रॉबेरी लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. लागवडीस अति पावसाचा फटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात होणारी स्ट्रॉबेरी लागवड आता ऑक्टोबर महिन्यात सुरू आहे.

जिल्ह्यात अति पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवडीवर परिणाम झाला आहे. महाबळेश्वर, जावळी तालुक्यांत सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यात लागवड सुरू होते. यामुळे दिवाळीच्या हंगामात ग्राहकांना स्ट्रॉबेरी मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होत असते.

Strawberry Cultivation
Strawberry Cultivation : पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवडीस एक महिना विलंब

या वेळी मात्र सप्टेंबर महिन्यात महाबळेश्वर, जावळी, वाई, कोरेगाव, सातारा तालुक्यांत बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाला आहे. याचा परिणाम स्ट्रॉबेरी रोपे व लागवडीवर झाला आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यात अगदी किरकोळ क्षेत्रावर लागवड झाली आहे. पॉलिहाऊसमध्ये तयार करण्यात आलेली रोपांची काही प्रमाणात सप्टेंबर महिन्यात लागवड झाली होती.

मात्र पावसामुळे रोपांचे व लागवड झालेल्या रोपांचे नुकसान यामुळे अगदी किरकोळ स्वरूपात दिवाळी स्ट्रॉबेरी मिळणार आहे. पावसामुळे सुमारे एक महिना स्ट्रॉबेरीची लागवड लांबली आहे. ऑक्टोबर महिन्यात पावसाने उघडीप मिळताच लागवडीचे काम सुरू झाली होती.

Strawberry Cultivation
Strawberry Cluster : भीमाशंकरला साकारतेय स्ट्रॉबेरी क्लस्टर

८० टक्के लागवड झाली असून पाऊस नसल्याने लागवड गतीने सुरू आहे. सुरवातीस झालेल्या लागवडीमुळे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्ट्रॉबेरी ग्राहकांना मिळणार आहे. नाताळ व नववर्षात स्वागत स्ट्रॉबेरीचा पूर्ण क्षमतेने आस्वाद ग्राहकांना मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा आहे.

जिल्ह्यात या वर्षी विविध देशांतून १६ लाख मदरप्लँट (मातृवृक्ष) आयात करण्यात आली आहेत. महाबळेश्वर तालुक्यात सुमारे दोन हजार एकरावर स्ट्रॉबेरी लागवड झाली असून, अजून ५०० ते ७०० एकरावर स्ट्रॉबेरी लागवड होण्याचा अंदाज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Agrowon
agrowon.esakal.com