Ahilyanagar News : मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी (१७ सप्टेंबर) अहिल्यानगर ते बीड रेल्वे धावणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करतील. यामुळे अनेक वर्षांपासूनचे रेल्वे सेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. उर्वरित बीड ते परळी वैजनाथ या रेल्वे मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत केल्या..अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. अहिल्यानगर-विघनवाडीपर्यंत रेल्वे धावत असून तेथून पुढे रायमोहा, बीडपर्यंत चाचणी सुरू आहे. बीडपासून परळीपर्यंतचे कामही वेगात सुरू आहे. त्यासंबंधी बुधवारी (ता. ३) उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. .Beed Water Storage : बीड जिल्ह्यातील सहा प्रकल्प कोरडे .महापारेषण कंपनीचे महाव्यवस्थापक संजीव कुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दशपुते, सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए., रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता विनीत कुमार, रेल्वेच्या पुणे विभागाचे अपर विभागीय व्यवस्थापक पद्मसिंह जाधव, मुख्य प्रवासी वाहतूक व्यवस्थापक मिलिंद हिरवे, मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला, मुख्य अभियंता प्रशांत भेगडे आदी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बैठकीत सहभाग घेतला..अजित पवार यांनी सांगितले, की बीड ते परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणे बीड जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून द्यावी. या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम तातडीने अदा करण्यात यावी. .Beed Railway : स्वप्नपूर्ती झाली, आता विकासाला चालना मिळेल.अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये देण्यात यावेत. उर्वरित १५० कोटींची तरतूद करावी. रेल्वेने आतापर्यंत दिलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी. कामाला गती देऊन पुढील काळात सुसज्ज रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे..अहिल्यानगर-परळी रेल्वे मार्गाची स्थितीएकूण लांबी - २६१.२५ किलोमीटरएकूण भूसंपादन १८२२.१६८ हेक्टरमार्गावरील पूल १३०मोठे पूल ६५छोटे पूल ३०२प्रकल्पाची किंमत ४८०५.१७ कोटी .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.