Dimbhe Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Dimbhe Dam: डिंभे धरणात तीन टीएमसी पाणीसाठा

Water Level Crisis: आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात केवळ २४.१५ टक्के म्हणजे ३.०१७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यात सहा टक्क्यांची घट झाल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Ambegaon News: आंबेगाव तालुक्यातील डिंभे येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशयात रविवारी (ता. १३) सकाळी सहा वाजता ३.०१७ टीएमसी म्हणजेच २४.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरणाच्या डावा कालव्यातून ६०० व उजवा कालव्यातून २०० असा एकूण ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाची साठवण क्षमता १३.५० टीएमसी आहे

गेल्या वर्षी २८ सप्टेंबपर्यंत धरण १०० टक्के भरले होते. त्यानंतर सध्याच्या घडीला धरणात फक्त २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आजपर्यंत ३० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता.

त्यामुळे यावर्षी पाणीसाठ्यात सहा टक्क्यांनी घट दिसून येत आहे. धरणातील पाणी मे, जून महिन्यांपर्यंत टिकवून ठेवणे आवश्यक असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. आंबेगावच्या पश्चिम आदिवासी भागात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे.

डोंगर माथ्यावरील गावे व वाड्यावस्त्या तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ‘हर घर जल, हर घर नल’ योजनेअंतर्गत काही गावांमध्ये पाण्यासाठी पाइपलाइन टाकल्या आहेत. तरी काही गावांमध्ये पाइपलाइनचे काम संथ गतीने सुरू आहे. परंतु, धरणातच पाणी नसेल तर नळाला पाणी कुठून येणार, असा प्रश्न आदिवासी बांधवांनी केला आहे.

जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण

नैसर्गिक पाणवठे आटल्याने माणसां बरोबरच पशुपक्षी व जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तळे, विहिरी, पाणवठ्यांत जेमतेम शिल्लक असणारे पाणी दूषित झाले असून यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT