Water Scarcity : दोन महिने पुरेल एवढाच जलसाठा

Water Crisis : उन्हाचा पारा वाढत असल्याने पाण्याचा वापर आणि बाष्पीभवनाचा वेग अधिकच वाढला आहे. परिणामी तलावांतील पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे.
Water Crisis
Water Crisis Agrowon
Published on
Updated on

Beed News : उन्हाचा पारा वाढत असल्याने पाण्याचा वापर आणि बाष्पीभवनाचा वेग अधिकच वाढला आहे. परिणामी तलावांतील पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे. उपलब्ध पाणीसाठा हा पुढील दोन महिने पुरेल इतकाच असल्याने तो बेताने वापरावा लागणार आहे. या दृष्टीने संभाव्य टंचाईच्या उपाय येाजनाही प्रशासनाकडून करण्यास सुरवात झाली आहे.

जिल्ह्यातील १६७ प्रकल्पांमध्ये आजघडीला १८३ दलघमी (२३.८८ टक्के) एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे. महिनाभरात तब्बल ११३ दलघमी पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या उन्हाचा पारा वाढल्याने दिवसेंदिवस पाणीपातळी घटत आहे. आता १४५ प्रकल्पांतील पाणीसाठा निम्म्यापेक्षा कमी आहे. तर, ४५ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे.

१२ प्रकल्प कोरडेठाक पडले आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५३६ मिलीमिटर आहे. गतवर्षी तब्बल ८३७ मिलीमिटर एवढ्या पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे सगळेच प्रकल्प ओसंडून वाहिले. मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्याची पाण्याची गरज आतापर्यंत भागली गेली.

Water Crisis
Ujani Dam Water Crisis: ‘उजनी’ची वाटचाल मृतसाठ्याकडे

परंतु, आता प्रकल्पातील पाणी कमी होण्यासह शेतातील विहीरी, सार्वजनिक पाणी योजनेच्या विहीरी, विंधन विहिरीही कोरड्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह टंचाईच्या झळांचा सामना करावा लागत आहे.जिल्ह्यातील संभाव्य टंचाईचा आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. संभाव्य टंचाई निवारणासाठी ५८ कोटी ९९ लाख ४९ हजार रुपये निधीची गरज पडणार असून तसे नियोजन सुरु आहे.

Water Crisis
Water Crisis: पाणी टंचाईची समस्या सुटणार कधी?

प्रशासनाचे नियोजन

यंदा अद्याप जिल्ह्यात एकही टॅंकर नसले तरी जुन-जुलैपर्यंत पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे विहिर अधिग्रहण, बोअर अधिग्रहण, टॅंकर सुरु करणे, तात्पुरत्या नळ योजना, जुन्या नळ योजनांची दुरुस्ती, नवीन विहिरी खोदणे, विहिरींतील गाळ काढणे असा संभाव्य टंचाई आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार करुन आयुक्तांना पाठविला आहे.

अशी आहे जलस्थिती

 भरलेले प्रकल्प : ००

 कोरडे प्रकल्प : १२

 जोत्याखाली पाणी असलेले प्रकल्प : ४५

 ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी : १ प्रकल्प.

 ५० ते ७५ टक्के पाणीसाठा : ९ प्रकल्प.

 एकूण उपयमुक्त पाणीसाठा : १८३.८३० दलघमी (२३.८८ टक्के)

बीड जिल्ह्यात तलावांतीलअनधिकृत पाणी उपसा बंद ठेवण्याबाबत तहसिलदारांना सूचना दिल्या आहेत. उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्यासह संभाव्य उपाययोजनांचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. त्यानुसार प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
- शिवकुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com