Grape Farming Crisis: पाणीटंचाईचा द्राक्षशेतीला फटका! उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल

Vineyard Water Shortage: जालना जिल्ह्यातील कडवंची परिसरातील द्राक्ष उत्पादकांना यंदा पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. पाऊस कमी झाल्याने विहिरी कोरड्या पडल्या असून, शेततळ्यांतील पाणी संपुष्टात आले आहे. परिणामी शेतकऱ्यांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. पुढील काही महिने ही स्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
Grape
GrapeAgrpwpm
Published on
Updated on

Jalna News: जालना जिल्ह्यातील कडवंची परिसरातील द्राक्षाच्या आगाराला यंदा जल संकटाला सामोरे जावे लागते आहे. शेततळ्यात उरलेल्या पाण्याला विकतच्या टँकरच्या पाण्याची जोड देऊन बागांना सिंचन करण्याचे काम द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहेत. आताची स्थिती लक्षात घेता पुढील तीन ते चार महिने द्राक्ष उत्पादकांची कठीण परीक्षा घेणारे ठरणार हे स्पष्ट आहे.

कडवंची परिसरातील कडवंचीसह नंदापूर, धारकल्याण, पिरकल्याण, नाव्हा, बोरखेडी, वरुड, अंभोरेवाडी आदी शिवारांत मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. २०१८ पूर्वी या परिसरातील द्राक्ष बागायतदारांची स्थिती उत्पादन आणि दराबाबत चांगली होती. परंतु त्यानंतरच्या काळात द्राक्ष बागायतदार दरासोबतच इतरही नैसर्गिक आपत्तीने त्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले. यंदा उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट आली. तरी सुरुवातीपासूनच दराबाबत समाधानकारक स्थिती राहिली.

Grape
Grape Production Drop: द्राक्ष हंगाम संकटात! यंदा उत्पादनात ४०% घट

सुमारे ४५ ते ६१ रुपयापर्यंतचे दर द्राक्षांना आजवर मिळत गेले. मात्र महिना घरापेक्षा अधिक कालावधीपासून पाण्याचे संकट द्राक्ष बागायतदारनांसमोर ‘आ’ वासून उभे आहे. पाऊसच कमी झाल्याने विहिरीतले पाणी आवरले. शेततळी ही अपेक्षेनुसार भरणे शक्य झाले नाही. वेळेपूर्वी भूगर्भातील जलस्रोत आटल्याने साधारणतः मार्च एप्रिलनंतर पाणी वापरल्या जाणाऱ्या शेततळ्यांवर फेब्रुवारीमध्येच ताण आला.

Grape
Indian Grape Market: भारतीय द्राक्षाला न्यूझीलंडची दारे उघडण्याची शक्यता

त्यामुळे त्यामधीलही पाणी झपाट्याने कमी झाले. त्यामुळे विविध संकटांमुळे आधीच दोन वर्षांत सुमारे ३० ते ४० टक्के बागांचे क्षेत्र आधीच घटले असताना यंदा पुन्हा ४० ते ५० टक्के क्षेत्र केवळ पाणीटंचाईच्या संकटामुळे घटण्याची भीती द्राक्ष उत्पादक व्यक्त करीत आहेत. माहितीनुसार साधारणतः १४० ते १४५ दिवसांनंतर द्राक्षाची तोड होणे अपेक्षित असते. परंतु प्रत्यक्षात १२०-१२५ दिवसांतच फळ काढली जात आहेत. त्याला केवळ पाण्याचा संकट कारणीभूत ठरते आहे.

महिनाभरापेक्षा जास्त कालावधीपासून आमच्या परिसरातील द्राक्ष उत्पादनावर पाणीटंचाईचे संकट आहे. पाऊसच कमी झाल्याने ही स्थिती ओढवली. आत्ताच्या घडीला २५ ते ३० टक्के शेतकरी टँकरने विकत पाणी घेऊन बागेला देत आहेत.
चंद्रकांत क्षीरसागर, माजी सरपंच, कडवंची
साडेचार हजाराला टँकर घेऊन चौथ्या पाचव्या दिवशी बागेला पाणी घालतो. आता असलेला माल काढल्यानंतर पुन्हा बाग जगण्याचे संकट असेल. अशी वेळ मार्च, एप्रिलनंतर कमी-अधिक प्रमाणात येते ती आताच आली.
उत्तम रामजी क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक, कडवंची

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com