Hingoli News : इसापूर धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक व धरणामध्ये जमा झालेला ९७ टक्के पाणीसाठा पाहता धरणाच्या मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने शनिवारी (ता. ७) इसापूर धरणाचे तीन दरवाजे ३० सेंटीमीटरने उघडून पैनगंगा नदीपात्रात ३०३९ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
इसापूर धरणाची पाणीपातळी ४४०.७६ मिलिमीटर झाली आहे. उपयुक्त पाणीसाठा ९४१.१६२ दलघमी एवढा झाला असून, धरणामध्ये ९७.६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे; तसेच इसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रांतर्गत असलेल्या जयपूर बंधाऱ्यांमधून ६५९८ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. इसापूर धरणाच्या प्रचालन जलाशय आराखडा मंजूर आहे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहता इसापूर धरणाच्या मंजूर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार ता. १५ सप्टेंबरपर्यंत धरणाची पाणीपातळी ४४०.७४ मिलिमीटर ठेवावी लागणार आहे.
धरण सुरक्षेच्या दृष्टीने शनिवारी (ता. ७) दुपारी साडेचारला धरणाचे तीन दरवाजे ३० सेंटीमीटरने उघडून ३०३९ पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
इसापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पैनगंगा नदीला येणाऱ्या संभाव्य पुरामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये, याकरिता नदीकाठावरील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती अभियंता हनुमंत धुळगुंडे यांनी दिली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.