Water Storage : दोन दिवसांच्या पावसाने २० प्रकल्प तुडुंब

Dharashiv Water Stock Update : सलग दोन दिवस शनिवारी आणि रविवारी जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील २२६ पैकी ६० प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : सलग दोन दिवस शनिवारी आणि रविवारी जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील २२६ पैकी ६० प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. शनिवारपूर्वी ४० प्रकल्प भरलेले होते. दोन दिवसांच्या पावसानंतर त्यात तब्बल २० प्रकल्पांची भर पडली आहे. तसेच २३ प्रकल्पांतील पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोचला असून तेही आता भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील आठवड्यात ३५.६८ टक्के असलेला मोठ्या, मध्यम आणि लघू अशा एकूण २२६ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा बुधवारअखेर (ता. ४) ४५.३० टक्के झाला आहे. आठ दिवसांत या पाणीसाठ्यात तब्बल १० टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी या दरम्यान हाच उपयुक्तसाठा केवळ ११.६ टक्के इतका होता.

Water Storage
Water Storage : एका आठवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांनी टाकली कात

जिल्ह्यातील ३७ प्रकल्प जोत्याखाली, तर २ प्रकल्प कोरडे आहेत. एकमेव मोठ्या सीना कोळेगाव प्रकल्पांतील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. मागील आठवड्यात ३.९१७ टक्के असलेला उपयुक्त पाणीसाठा आता २५.९१ टक्केवर पोचला आहे.

सर्व १७ लघू प्रकल्प व साठवण तलावांनी पाणीसाठ्याच्या टक्केवारीचे अर्धशतक पार केले असून हे प्रकल्प ५० ते ७५ टक्के भरले आहेत. २५ ते ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा असलेले प्रकल्प ३५ आहेत. तर ५३ प्रकल्पांत २५ टक्केपेक्षा कमी उपयुक्त पाणी असून केवळ २ प्रकल्प कोरडे आहेत.

जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांतील एकूण पाणीसाठा क्षमता ८६१.८६५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा क्षमता ७२६.९८३ दलघमी इतकी आहे. या प्रकल्पांत सध्या एकूण ४५६.९८४ दलघमी इतका पाणीसाठा झालेला आहे, तर उपयुक्त पाणीसाठा ३२९.३४९ दलघमी इतका झाला आहे.

Water Storage
Dam Water Storage : ‘येलदरी’त ५३.०१ टक्के, तर ‘निम्न दुधना’त ७०.८५ टक्केवर पाणीसाठा

तीन मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा

तालुक्यातील जकापूर मध्यम प्रकल्पात १.३२५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे. तुरोरी मध्यम प्रकल्पात २.४१२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. तर बेन्नीतुरा मध्यम प्रकल्पात १.७८६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. तीनही मध्यम प्रकल्प भरण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. दरम्यान, कोरेगाव लघू पाटबंधारे तलाव भरल्याने उमरगा शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी आधार ठरला आहे.

सीना कोळेगावच्या साठ्यात वाढ

जिल्ह्यात सर्वात मोठा असलेल्या सीना कोळेगाव प्रकल्पात २५.९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. या प्रकल्पात एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ८९.३४८ दशलक्ष घनमीटर आहे. त्यापैकी सध्या प्रकल्पात प्रत्यक्षात २३.१४७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

शंभर टक्के भरलेले प्रकल्प

तेरणा, बाणगंगा, संगमेश्वर, करजखेडा, वडाळा, सांजा सा.त., आळणी, खामसवाडी सा.त., खानापूर, राघुचीवाडी, पोहणेर, वलगूड ला.पा., सोनेगाव, वलगूड सा.त., आंबेजवळगा, खेड, बेडकीनाला, येरमाळा, चोराखळी, मलकापूर, येडेश्वरी, कुंथलगिरी, आरसोली, नांदगाव, वाकवड, गिरलगाव, घुलेवाडी, डुक्करवाडी, सोनगिरी, बोरगाव, मांडवा, हातोला, तिंत्रज, तांबेवाडी, निम्नखेरी, कामठा, सांगवी काटी, व्होर्टी, इटकळ, पळस निलेगाव, मुरटा, खुदावाडी, तामलवाडी, सलगरा दिवटी, अपसिंगा, सलगरा, वाणेगाव, मुरटा, व्होर्टी २, कोळसूर, तलमोमवाडी, वागदरी, भिकार सांगवी, पेठ सांगवी, नारंगवाडी, कोरेगाव, एकूरगा, बलसूर २, दगड धानोरा, हिप्परगा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com