Deforestation: सातपुडा पर्वतरांगेत लागणारे वणवे, होणारी वृक्षतोड व वन्यप्राण्यांची शिकार या प्रकारांमुळे या भागातील वृक्षसंपदा व वन्यजीव संकटात सापडले आहेत. यावर ठोस प्रतिबंधक उपाय योजले जात नसल्याने सातपुडा असुरक्षित बनत चालला आहे, अशी खंत स्थानिक शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली..स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या हद्दीत लागणाऱ्या वणव्यांमुळे वृक्ष नष्ट होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. वनीकरणावर खर्च केला जाणारा शासकीय निधीही त्यामुळे वाया जातो आहे. शासकीय नियम फक्त कागदोपत्री असल्याचे येथील अनेक घटनांतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता ही वने वाचवण्यासाठी वन विभाग, संयुक्त वनव्यवस्थापन समित्या व स्थानिक ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सातपुड्याच्या कुशीतील गावांमधून पुढे येत आहे..Leopard Sighting: वारणावती येथे दोन बिबटे सीसीटीव्हीत कैद.अर्थात, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांत समित्या स्थापन झाल्या असल्या, तरी त्या निष्क्रिय आहेत. मागील महिन्यात यावलसह इतर वनक्षेत्रांत चार-पाच वणव्याच्या घटना घडल्या. त्यात प्रचंड हानी झाली, या वस्तुस्थितीकडेही पर्यावरण तज्ज्ञांनी लक्ष वेधले..Leopard Sightings: बिबट्याच्या त्रासाने शेतकरी हैराण .नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, अक्राणी, अक्कलकुवा, धडगाव व तळोदा भागात स्वयंसेवी संस्था व जागरूक नागरिक वनसंपदेचे जतन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र शासनाने त्यांना सहकार्य व प्रोत्साहन द्यावे. वनविभाग फक्त कारवाई व गस्तीपुरता मर्यादित दिसतो..गावोगावी जनजागृती व रोजगार निर्मितीसाठी सातपुड्यात काम व्हावे, अशी अपेक्षा येथील पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली. सातपुड्यातील आमराई, पळस, मोह यांसारख्या वृक्षांची संख्या कमी होत असून, त्यांच्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या अपप्रवृत्तींविरोधात कारवाई व्हावी, अशी आग्रही मागणी त्यांच्याकडून होत आहे..दुर्मीळ वनसंपदेचा ऱ्हाससातपुडा पर्वतावर दुर्मीळ वृक्षांसमवेतच लहान-मोठी झाडेझुडपे, हिरवेगार गवत व वृक्षवेली असल्याने ससे, तरस, माकड, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर, लांडोर, मोर यांसारखे प्राणी वावरतात. वणव्यांमुळे जंगलातील प्राणी, झाडेझुडपे, वनऔषधी वनस्पती होरपळून नष्ट होतात. पक्ष्यांची अंडी, घरटी व पिल्ले जळून जातात. वन्यजीव व जीवसृष्टीचा ऱ्हास थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न आवश्यक आहेत, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी बोलून दाखविली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.