Water Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Management : दरवर्षी लाखो लिटर पाणी वाया; जल व्यवस्थापनाची तातडीची गरज

Water Crisis : पाटबंधारे विभागाने तालुक्यातील हिरण्यकेशी, चित्री, चिकोत्रा, आंबेओहळ व तारओहळ या २७ बंधाऱ्यांमध्ये सुमारे ६५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा केला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : पाटबंधारे विभागाने तालुक्यातील हिरण्यकेशी, चित्री, चिकोत्रा, आंबेओहळ व तारओहळ या २७ बंधाऱ्यांमध्ये सुमारे ६५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा केला आहे. मात्र पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याचे दिसते.

दरवर्षीचे हे चित्र असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शेतकऱ्यांकडून जल व्यवस्थापनाची गरज आहे. प्रशासकीय पातळीवरही जलसाक्षरतेबाबत प्रबोधनाची आवश्यकता आहे.

तालुक्यात सुमारे दोन हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस पडतो. हिरण्यकेशीसह चित्री, चिकोत्रा, आंबेओहळ, तारओहळ या नद्या व नाल्यावर पाटबंधारे प्रकल्प आहेत. त्यामुळे या नदी व नाल्यांच्या पात्रामध्ये मुबलक पाणीसाठा दरवर्षी असतो. नोव्हेंबरनंतर पाटबंधारे विभाग सुमारे २७ कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये पाणी अडवून शेतीसाठी पाणी साठा केला जातो.

सुमारे ६५० दशलक्ष घनफूट पाणी बंधाऱ्यात अडवले जाते. यातून सुमारे नऊ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. ऊस या नगदी पिकासह उन्हाळी भुईमूग, मिरची, भाजीपाला, सूर्यफूल यांसह विविध पिकांना पाण्याचा वापर केला जातो. पाणी मुबलक असले तरी पाण्याचा योग्य वापर होताना दिसत नाही.

पाण्याचे बाष्पीभवन, बंधाऱ्यांची गळती, मातीचे पाट व जलवाहिन्यांना असलेली गळती यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. त्याचबरोबर पाणी पिकांना मुबलक प्रमाणात पिकांना दिल्यावर उत्पादन वाढते या गैरसमजापोटी पाण्याचा अतिरिक्त वापर होतो.

या सर्वमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याचा योग्य वापर होण्याची गरज आहे. पाणी चळवळीचे कार्यकर्ते संतप देसाई म्हणाले, की जल व्यवस्थापनावर लोकांचे सामुदायिक नियंत्रण हवे. पूर्वी पाणी हे शेती व पिकाच्या मानकाप्रमाणे वापरले जात होते. सध्या उसासारख्या नगदी पिकाच्या उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर दिल्याने पाण्याचा अतिरिक्त वापर सुरू झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

SCROLL FOR NEXT