Water Canal Management : चार कोटी मंजुरीनंतरही अंजना-पळशी कालवा दुरुस्तीचे काम रखडले

Anjana-Palshi Canal : अंजना-पळशी मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ३ फेब्रुवारी २०२३ प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.
Water Canal
Water Canal Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : अंजना-पळशी मध्यम प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ३ फेब्रुवारी २०२३ प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. ४ कोटी ८३ लाख ४२ हजार ८५ रुपयांचा निधी मंजूर होऊनही आजपर्यंत कालवा दुरुस्तीचे काम झालेले नाही. तरी तत्काळ नियोजित कामे पूर्ण करण्यात यावीत, यासाठी प्रकल्प लाभक्षेत्रातील गावांमध्ये सह्यांची मोहीम सुरू झाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अंजना पळशी मध्यम प्रकल्पाच्या (ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) डाव्या व उजव्या कालव्यांची दुरुस्ती करण्याबाबत रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडणे व डाव्या कालव्याद्वारे अमदाबाद, नाचनवेल (चीचखोरी) पाझर तलावात पाणी सोडण्याचे नियोजन करणे व

Water Canal
Agriculture Irrigation : ...अखेर अंजना पळशी मध्यम प्रकल्पातून पाणी सोडले

उजव्या कालव्याद्वारे जवखेडा बु पाझर तलावा क्र १ मध्ये पाणी सोडणे या मागण्यांच्या निवेदनावर पिंपरखेड, सारोळा, आमदाबाद ,नाचनवेल- कोपरवेल, जवखेड, नादरपूर आदी गावांतील आजी, माजी सरपंच-उपसरपंच यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. अंजना-पळशी मध्यम प्रकल्पाचे पाणी अंजना नदी मुख्य पात्रातील पिण्याच्या पाण्याच्या योजनांना पुरेसा पाणीपुरवठा उजव्या कालव्याद्वारे करावा, अशी मागणी या निवेदनातून केली जाणार आहे.

या वर्षी अंजना पळशी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. प्रकल्प लाभ क्षेत्रातील मोहाडी-अमदाबाद, नाचनवेल, जवखेडा, सारोळा इत्यादी शिवारातील शेतीला रब्बी हंगामात पुढील महिन्यात पिकासाठी पाण्याची आवशकता आहे. मात्र या प्रकल्पाचे ठावे-उजवे कालवे, पाटचारी नादुरुस्त असून या मध्ये उंच झाडे झुडपे वाढलेली आहेत, यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते.

तसेच पाट चाऱ्यांना दरवाजे नाहीत ही दुरुस्तीची कामे करण्यात यावी. यासंबंधी २७ सप्टेंबर २०२१ रोजी व त्यानंतर दोन वेळा कार्यकारी अभियंता गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ यांना निवेदन देण्यात आले. लवकरच स्वाक्षऱ्यांसह निवेदन गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना देण्यात येणार असल्याचे नाचनवेलचे उपसरपंच रावसाहेब शिंदे यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com