Sunburn  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Heat : यंदा तीव्र उन्हाळा पिकांसाठी ठरतोय मारक

Summer Season : यंदाचा उन्हाळा सर्वाधिक तप्त असून नागरिकांसह पशुपक्षी, पिकांसाठीही त्रासदायक झालेला आहे. दररोजचे तापमान आता ४२ ते ४४ अंशादरम्यान राहत आहे.

Team Agrowon

Akola News : यंदाचा उन्हाळा सर्वाधिक तप्त असून नागरिकांसह पशुपक्षी, पिकांसाठीही त्रासदायक झालेला आहे. दररोजचे तापमान आता ४२ ते ४४ अंशादरम्यान राहत आहे. यामुळे वाढलेल्या तापमानाचा भाजीपाला, उन्हाळी पिके तसेच विविध प्रकारची पिके, फळबागांवर परिणाम होत आहे.

पाण्याची सुविधा असल्याने या वर्षी उन्हाळी हंगामात ज्वारी, भुईमूग, मका तसेच भाजीपालावर्गीय पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. हे क्षेत्र अकोल्यात ५ हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. याशिवाय हंगामी स्वरूपात कलिंगड लागवड आहे. तसेच केळी, पपई, लिंबू, संत्रा या पिकांच्या बागाही आहेत.

तज्ज्ञांच्या मते तीव्र स्वरूपाच्या उष्ण वातावणामुळे संत्रा, मोसंबी, तसेच इतर लिंबूवर्गीय फळबागांवर आलेली कोवळी नवती करपणे, आंबिया बहराच्या लहान फळांची फळगळ, खोड तडकणे, झाडे निस्तेज दिसणे, नवीन कलमांमध्ये मर होणे असे दुष्परिणाम दिसून येऊ शकतात.

एप्रिलमध्ये लागवड केलेल्या टिश्‍युकल्चर केळी रोपांचे संरक्षण व्हावे यासाठी काही शेतकऱ्यांनी पिकात बोरूची लागवड केल्याचे फायदेही झालेले आहेत.

जमिनीचेही तापमान वाढले

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जमिनीचे तापमान दैनंदिन स्वरूपात मोजले जाते. हे तापमान जमिनीत तीन स्तरांचे घेतले जाते. यात वरच्या स्तरांपासून ५ सेंटीमिटरच्या आत, नंतर १० आणि १५ सेंटीमिटर अशा स्तरावरील तापमान नोंद घेतली जाते. सध्या मागील आठवड्यापासून हे तापमान वाढलेले आहे. वरील स्तराचे (५ सेंटीमिटर) तापमान ५२ ते ५४ पर्यंत पोचले आहे. १० सेंटीमिटरपर्यंत ४७ ते ४९ आणि १५ सेंटीमिटरवरील तापमान हे ३२ ते ३५ पर्यंत आलेले आहे, अशी माहिती विद्यापीठातील नोंदीवरून स्पष्ट झाले. अकोला जिल्ह्यात यावर्षी तापमान सातत्याने आता ४० अंशावर पोचलेले आहे. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातही याच बरोबरीने तापत आहे.

तारीख तापमान कमाल आद्रर्ता

(सकाळ-दुपार) जमिन तापमान (दुपारी ५ सेंमी)

३ मे ४२ ४९-१० ५५.२

४ मे ४३.२ ४०-९ ५६.४

५ मे ४३ ४२-११ ५६

६ मे ४३.२ ४४-१० ५६.५

सध्या तापमानामुळे पपईच्या झाडावरील पाने वाळून गळत आहेत. शिवाय यामुळे फळ उघडे पडून पश्‍चिम बाजूने फळावर उन्हाचे चट्टे पडत आहेत. यामुळे व्यापारी अशा फळाची खरेदी करीत नाहीत. माल विक्रीला अडथळे निर्माण होतात. दुसरीकडे पिकाला पाण्याची गरजही वाढली आहे. टरबूज, खरबूजसारख्या पिकांना तर नियमित पाणी हवे असते. यात थोडा जरी खंड पडला, एक दिवस पाणी उशिराने दिले तर फळांना फटका बसतो.
अनंता इंगळे, पपई उत्पादक, चितलवाडी, जि. अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT