Tomato Production : तापमान वाढीमुळे टोमॅटो क्लस्टरमध्ये उत्पादन घटीचा धोका

Summer Heat : तापमान वाढीचा फटका भाजीपाला आणि उन्हाळी टोमॅटो उत्पादनाचे आगार असलेल्या उत्तर पुणे जिल्‍ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांना बसला आहे.
Tomato Production
Tomato ProductionAgrowon

Pune News : तापमान वाढीचा फटका भाजीपाला आणि उन्हाळी टोमॅटो उत्पादनाचे आगार असलेल्या उत्तर पुणे जिल्‍ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांना बसला आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरसह नगर जिल्ह्यातील पारनेर आणि श्रीगोदा तालुक्यांत उन्हाळी टोमॅटोचे मोठे क्षेत्र आहे.

या परिसरांतून देशासह आखाती देशांमध्ये टोमॅटोचा पुरवठा होत आहे. मात्र या वर्षी तापमानाने चाळीशी पार केल्याचा फटका टोमॅटो, काकडीच्या रोपांना बसला आहे. यामुळे उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घटीचा धोका शेतकरी, संशोधक आणि अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

उन्हाळी टोमॅटोसाठी जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूरसह पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा परिसरांत मोठ्या प्रमाणावर मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनावर टोमॅटोची लागवड केली जाते.

Tomato Production
Tomato Disease : टोमॅटो पिकातील ‘लवकर येणाऱ्या करपा रोगाची लक्षणे

या टोमॅटोसाठी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारातील शेतकरी ते ग्राहक हा थेट बाजार उपलब्ध आहे. या बाजारातून देशांतर्गत बाजारपेठेसह आखाती देशांमध्ये टोमॅटोची निर्यात होते.

मात्र या वर्षी तापमानाने चाळीशी पार केल्याने टोमॅटो, काकडी या पिकांच्या रोपांची मुळे अन्नद्रव्य शोषून घेण्यास अकार्यक्षम झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. परिणामी रोपांची पाने करपणे, आकसणे, टोमॅटोला वाट्यांचा आकार येणे असे प्रकार होऊ लागले आहेत. या प्रकारांना कोणताही औषधोपचार नसल्याने नुकसानीचा धोका वाढला आहे. हे नुकसान साधारण ५० टक्क्यांपर्यंत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

याबाबत नियमित टोमॅटोचे उत्पादन घेणारे राजू कोंडे (रा.धामणखेल) शेतकरी म्हणाले, ‘‘मी दर वर्षी उन्हाळी टोमॅटोची मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनावर लागवड करीत आहे. या वर्षी चार एकर टोमॅटोची लागवड केली असून, यंदा तापमान वाढल्याने रोपांची मरतूक वाढली आहे. तर रोपांची पुरेशी वाढ होताना दिसत नाही. यामुळे खत औषधांचा खर्च वाढला आहे. पण त्याचाही फायदा होताना दिसत नाही. यामुळे उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घटीचा धोका आहे.’’

Tomato Production
Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

नवीन रोपांना फटका

नवीन रोपे नर्सरीमध्ये तयार आहेत. मात्र वाढत्या तापमानात लागवडी केल्यावर मरतुकीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या लागवडी रखडल्या आहेत. परिणामी नर्सरीमधील रोपे शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

दर वाढताहेत

सध्या नारायणगावच्या टोमॅटोच्या खुल्या बाजारात २० किलोच्या क्रेटला २०० ते २५० रुपये दर आहेत. मात्र तापमान वाढीच्या झटक्यामुळे नवीन लागवडी होत नाहीत, परिणामी उत्पादन घटून दरवाढीचा अंदाज आहे. हीच दरवाढ ४०० ते ५०० रुपये क्रेटला म्हणजेच प्रति किलोला २० ते २५ रुपये होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com