Parliament Winter Session 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Parliament Winter Session 2024 : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, अदानी, वक्फ विधेयकामुळे विरोधक आक्रमक होणार?

Adani case and Waqf Bill : आजपासून (ता.२५) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. याआधी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीने बैठक बोलावली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : आजपासून (ता.२५) संसदेच्या हिवाळी अधिवेशनास सुरूवात होत आहे. यावेळी अधिवेशनात अदानी आणि वक्फ दुरुस्ती विधेयकावरून तापमान तापण्याची शक्यता आहे. दरम्यान सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीने बैठक बोलावली असून सरकारला घेरण्यासाठी विरोधक अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. दरम्यान हरियाणापाठोपाठ महाराष्ट्राच्या निराशाजनक निकालामुळे विरोधी इंडिया आघाडीत अस्वस्थता पसरली आहे.

सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी पहिल्याच दिवशी अदानी मुद्द्यावर चर्चेची मागणी केली. मात्र सरकारने कामकाज सुरळीत चालू देण्याचे आवाहन केले असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेसचे गौरव गोगोई आणि आपचे संजय सिंह यांनी अदानी समूहावरील आरोप आणि भ्रष्टाचारप्रकरणी अमेरिकेत दाखल झालेला खटला अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी सोमवारी सर्व कामकाज बंद पाडून आधी या विषयावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. याशिवाय मणिपूर हिंसाचार, उत्तर भारतातील प्रदूषण, महागाई आणि बेरोजगारी यावर देखील अधिवेशनात चर्चा व्हावी असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक

दरम्यान काँग्रेस पक्षाच्या संसदीय पक्षाच्या कार्यालयात आज सकाळी १०.३० वाजता लोकसभा खासदारांची बैठक होणार आहे. त्यामध्ये सभागृहाच्या कामकाजाची रणनीती ठरवली जाणार आहे.

अदानी आणि वक्फ दुरुस्ती विधेयक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अदानी आणि वक्फ दुरुस्ती विधेयकाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. याआधी देखील काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील नेत्यांनी अदानी समूहाबाबत वेळोवेळी सरकारवर निशाणा साधला आहे. दरम्यान अमेरिकेतील अदानी समूहाबाबत लाचखोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी अधिक आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. इंडिया आघाडी पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावर चर्चा करण्यावर ठाम आहे. मात्र अदानी प्रकरणावर दुर्लक्ष करण्यासाठी सत्ताधारी वक्फ दुरुस्ती विधेयक मांडतील.

इंडिया आघाडीत अस्वस्थता

नुकताच हरियाणाचा निकाल लागला असून यानंतर शनिवारी (ता.२३) महाराष्ट्र आणि झारखंडचे निकाल लागले आहेत. ज्यात हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातही भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे सध्या सत्ताधारी भाजपमध्ये उत्साहात आहे. पण लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात झालेल्या पराभवामुळे विरोधी इंडिया आघाडीत निराशा पसरली आहेत.

याही विषयांवर चर्चेची मागणी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिल्ली प्रदूषण, वायनाड भूस्खलन आणि अदानी प्रकरणावर चर्चेची मागणी केली आहे. तर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे. त्यांनी अदानी समूहाविरुद्ध युनायटेड स्टेट्समध्ये दोन खटल्यांचा उल्लेख केला आहे. तसेच काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी अदानी समूहाच्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जेपीसीच्या स्थापनेवर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Winter Update : तापमानात घसरण; थंडी, धुक्यात वाढ शक्य

Gokul Dudh Sangh : सहकाराचं सत्ता केंद्र गोकुळ दूध संघ महाडिकांच्या निशाण्यावर, सतेज पाटलांना धक्का बसणार?

Wheat Cultivation : उशिरा गहू लागवडीचे नियोजन

Fruit Crop Farming : फळपिकांतून गाठली आर्थिक सक्षमता

PM Narendra Modi : 'जनतेने ८० वेळा नाकारलेले आज संसदेचे कामकाज बंद पाडतायतं' पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT