Rahul Gandhi On Gautam Adani : अमेरिकेत अदानींवर खटला दाखल, अदानींना तात्काळ अटक करण्याची राहुल गांधी यांची मागणी

Adani Green Bribery Case : उद्योगपती आणि अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांना अमेरिकेने मोठा झटका दिला आहे. त्यांच्यावर न्यूर्याकमधील जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला आहे. यानंतर भारतात मोठी खळबळ उडाली आहे.
Rahul Gandhi On Gautam Adani
Rahul Gandhi On Gautam AdaniAgrowon
Published on
Updated on

Pune News : उद्योगपती आणि अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेच्या न्यायालयात खटका दाखल करण्यात आला आहे. ज्यामुळे देशात एकच खळबळ उडाली असून त्यांच्यासह सागर अदानी यांच्याविरोधात अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक करणे आणि एक कॉन्ट्रॅक्टसाठी भारतीय अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची लाच दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी (ता.२१) पत्रकार परिषद घेत अदानींना अटक करा, अशी मागणी केली आहे.

गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये फसवणुकीचा तसेच लाच दिल्याचा खटला दाखल करण्यात आला आहे. अमरिकेतील त्यांच्या एका कंपनीला काँट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी २२३६ कोटी रुपयांची लाच देण्याचा आणि हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न करणे असे आरोप आहेत. या कॉन्ट्रॅक्टमधून पुढील वीस वर्षांत दोन अब्ज डॉलरचा फायदा मिळू शकतो, असा अंदाज असल्याने खोटे दावे करून कर्ज आणि बॉन्ड्सची जुळवाजुळव करण्यात आल्याचा, असा आरोप करण्यात आला आहे.

Rahul Gandhi On Gautam Adani
Rahul Gandhi Guarantee : राज्याची सत्ता मविआकडे द्या, ३ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करू; राहुल गांधींची ग्वाही

आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला आहे.

मोदी 'एक है तो सेफ है' चा नारा देत असतात. पण भारतात अदानी आणि मोदी एक असतील तरच ते सुरक्षित आहेत हेच आता सिद्ध होत आहे. भारतात अदानींना कोणीही काहीही करू शकत नाही. एक मुख्यमंत्री १० ते १५ कोटी रुपयांच्या आरोपाखाली तुरुंगात जातो. पण अदानी २ हजार कोटींचा घोटाळा करतात, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.

Rahul Gandhi On Gautam Adani
Adani Hydroelectric Project : कोल्हापूर पाठोपाठ आता अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला साताऱ्यात तीव्र विरोध

तसेच राहुल गांधी यांनी, अदानींनी इतरही अनेक घोटाळे त्यांनी केले असावेत. पण ते बेधडकपणे फिरत आहेत. यामुळेच आम्ही पुन्हा पुन्हा सांगत आहोत की पंतप्रधान मोदी अदानींना वाचवत आहेत. ते अदानी यांच्यासोबत भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. भाजप अदानींना पूर्ण पाठिंबा देत असून आमची मागणी जेपीसीची आहे. अदानी कायदेशीररित्या काम करत असतील तर काही अडचण नाही आणि भीण्याचेही कारण नाही. पण आता सरकारला काही चुकीचे वाटत असेल तर चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

यानंतर आता अदानी ग्रुपकडून एक निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, अमेरिकन न्याय विभाग आणि सिक्युरिटीस अन्ड एक्सचेंज कमिशनने आमच्या बोर्डचे सदस्य गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. हा खटला न्यूर्याकमधील अमेरिकी जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.तर आता या घटनेमुळे आमच्या कंपनींनी सध्या प्रस्तावित अमेरिकी डॉलर डॉमिनेटेड बॉन्ड ऑफरिंग ही योजना रद्द करण्यात आल्याची घोषणा अदानी ग्रीन कंपनीने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com