Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : दहा गावांतील शेतीसाठी पाण्याचा प्रश्न मिटणार

Water Issue : दोन वर्षांपासून धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले होते व सिंचनासाठी वापर पूर्णपणे थांबवण्यात आले होते.

Team Agrowon

Latur News : दोन वर्षांपासून पाण्याने तहानलेला तुरोरी मध्यम प्रकल्प गेल्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरल्याने तुरोरीसह आष्टा (ज.) दाबका आदी गावांचा पिण्याच्या पाण्याचा व दहा गावातील शिवारातील शेतीचा प्रश्न मिटला आहे.

दोन वर्षांपासून धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले होते व सिंचनासाठी वापर पूर्णपणे थांबवण्यात आले होते. त्यामुळे उसाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

पाण्याअभावी ऊसाच्या उत्पन्नात घट झाली होती व बहुतांश शेतकऱ्यांनी उसाचे फड मोडीत काढून यंदा सोयाबीनची पेरणी केली आहे. आता धरण पूर्ण भरल्याने गावकऱ्यांची तीन वर्षांपर्यंत तहान भागणार असून शेतीचा दोन वर्षे सिंचनाचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे.

सांडवा पडलाच नाही

धरण ओव्हरफुल झाले की गेट आपोआप पडतात पण सर्वच्या सर्व गेटचे रबर खराब झाल्याने गेट पडत नाहीत व पडलेले गेट तसेच राहिल्याने सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे, त्यामुळेच धरण भरण्यासाठी वेळ लागला आहे.

आता तरी गेटची दुरुस्ती झाली तर मोठ्या प्रमाणात कर्नाटकात वाहून जाणारे पाणी धरणात राहू शकणार आहे. त्यासाठी सांडव्याची गळती थांबवण्याची आवश्यकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

VBG-Ram-ji: ग्रामीण रोजगाराच्या हमीची ऐशी-तैशी

Indian Political Challenges: राहुल गांधी आणि ‘सीजेपी’चे सरकारपुढे आव्हान

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

SCROLL FOR NEXT