Hydroponics Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Hydroponics Farming : जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार ; हायड्रोपोनिक्स शेतीसाठी ५० टक्के अनुदान

Agriculture Subsidy : महाराष्ट्र सरकारने पशु आहारासाठी हायड्रोपोनिक्स शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : केंद्र सरकारसह देशातील विविध सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक शेतीविषयीच्या योजना राबवत आहे. हायड्रोपोनिक्स या आधुनिक शेती तंत्रज्ञानासाठी केंद्र आणि राज्य सरकारे अनुदान देत आहेत.

महाराष्ट्र सरकारने पशु आहारासाठी हायड्रोपोनिक्स शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाकडून प्रत्येक राज्यांसाठी वेगवेगळे अनुदान यासाठी उपलब्ध आहे.

काय आहे हायड्रोपोनिक्स शेती

माती विना शेती म्हणजेच हायड्रोपोनिक्स शेती. हायड्रोपोनिक्स हा एक ग्रीक शब्द आहे. ही एक आधुनिक शेती पध्दती आहे. यामध्ये पाण्याचा वापर करून हवामान नियंत्रित करून शेती केली जाते. हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये पाईच्या माध्यामातून शेती केली जाते. पाईपला वरून छिद्रे पाडली जातात.

या छिद्रांमध्ये रोपे लावली जातात. पाईपमधील पाण्यात रोपाची मुळे बुडून राहतात. या पाईपमधूनच रोपासाठी आवश्यक खते दिली जातात. या तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे मातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार ५० टक्के अनुदान देत आहे.

हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी गुंतवणुकीवर सरकार अनुदान देत आहे. हे अनुदान राज्यांनुसार वेगवेगळे आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतीच जनावरांच्या चाऱ्यासाठी हायड्रोपोनिक्स शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने प्रत्येक राज्यांसाठी अनुदानाची नियमावली तायर केली आहे. या नियम आणि अटींच्या अधिन राहून शेतकरी हायड्रोपनिक्स शेतीसाठी अनुदान घेवू शकतात. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देवून त्यांच्या राज्यात उपलब्ध असलेले अनुदान आणि योजना शोधावे लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT