Aslam Abdul Shanedivan
सध्या मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात दुष्काळाच्या झळा बसत आहेत. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई असल्याने चाऱ्याला पाणी मिळत नाही. आहे त्यामुळे जनावरांसाठी चारा छावण्यांची मागणी होत आहे.
दुधासह शेतात कामासाठी लागणाऱ्या जणावरांसाठी चारा अतिशय महत्वाचा असतो. त्यासाठी शेतात गवत (चारा) लावला जातो. त्यासाठी पाणी ही मोठ्या प्रमाणात द्यावे लागते.
एका किलोच्या चाऱ्यासाठी तब्बल ६०-७० लिटर पाणी लागतं. मात्र कमी पाण्याच्या वापर करून जादा चारा घेता येतो. यासाठी हायड्रोफोनिक्स पद्धतीने चारा उत्पादन घ्यावं लागेल.
कमी दिवसांत चारा उत्पादनासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान हे हिरवा चारा उत्पादनासाठी पर्याय आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी जागेत, कमी वेळेत व कमी पाण्यावर चारानिर्मिती करता येते.
पाण्याची टंचाई, राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, चारानिर्मिती करण्यासाठी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करता येतं.
चाऱ्यामध्ये हिरवाचारा, वाळलेली वैरण, गवत, झाडपाला इ. चा समावेश होतो. हिरवा चारा हा जनावरांच्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेमुळे जनावरांची वाढ होते.
हा चारा अत्यंत लुसलुशीत, पौष्टिक व चवदार असून, त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे, एन्झाईम आणि सूक्ष्म अन्नघटकांचे प्रमाण भरपूर असते. पचनीय असतो