Hydroponic Fodder Farming : चारा बनवण्याची आधुनिक हायड्रोपोनिक पद्धत

Aslam Abdul Shanedivan

दुग्ध व्यवसाय

आपल्या राज्यात आजही ग्रामिणभागात मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला जातो. अनेक दुग्ध व्यवसायिक असे आहेत की त्यांच्या जमिनीनाहीत किंवा ते अल्पभूधारक आहेत. अशात म्हशी किंवा गायींच्या हिरवा चाऱ्याचा प्रश्न उद्धभवतो. यावर उपाय एकच हायड्रोपोनिक शेती.

Hydroponic Fodder Farming | Agrowon

हायड्रोपोनिक शेती

हायड्रोपोनिक शेती म्हणजेच माती विरहित शेती. मातीचा उपयोग न करता झाडांना आवश्यक असलेली पोषकद्रव्ये पाण्याच्या साह्याने दिली जातात यालाच हायड्रोपोनिक (Hydroponic) असे म्हणतात. हायड्रो म्हणजे पाणी आणि पोनिक म्हणजे कार्यरत म्हणजेच मातीविना शेती करणे.

Hydroponic Fodder Farming | Agrowon

हायड्रोपोनिक चारा उत्पादन प्रक्रिया

हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी फक्त चांगल्या बियाण्यांचा वापर करावा; ज्याचा फायदा चारा उत्पादनास चांगला होतो.

Hydroponic Fodder Farming | Agrowon

बाजरी आणि ज्वारी नको

हायड्रोपोनिक चारा बनवण्यासाठी मका, कडधान्य, गहू आणि हरभरा बियांचा वापर करावा. मात्र बाजरी आणि ज्वारीचा वापर टाळावा. त्याच्या अंकुरलेल्या पानांमध्ये विष असते जे तुमच्या पशुधनाला हानी पोहोचवू शकते.

Hydroponic Fodder Farming | Agrowon

थंड हवामानात गहू आणि ओट्स

सध्या हिवाळा सुरू असल्याने या काळात गहू आणि ओट्सच्या बिया वापराव्यात. उष्ण हवामानात मक्याच्या बिया हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी योग्य असतात.

Hydroponic Fodder Farming | Agrowon

कसा कराल चारा निर्मिती

एका शेडमध्ये प्लॅस्टिकच्या बादलीत 5-7 लिटर कोमट पाणी कोमट पाण्यात जो चारा हावा आहे त्याची बियाने कोमट पाण्यातून काढून घ्या. चांगल्या बियानांना 50 -100 ग्रॅम मीठ टाकून ते 12 तास पाण्यात भिजवू द्या. ते कापडी पिशवी ठेवा. त्यानंतर ते कोंब आळ्यानंतर छिद्रे असणाऱ्या ट्रे मध्ये समान अंतरावर पसरवून सात दिवस हलके पाणी शिंपडा. आपल्याला चारा मिळेल.

Hydroponic Fodder Farming | Agrowon

गरजेनुसार रॅक

पशुधनाच्या चार्‍याच्या गरजेनुसार हायड्रोपोनिक चारा रॅक तयार करा, समजा दररोज पाच ट्रे चारा लागत असेल तर सात दिवसांसाठी, 35 ट्रे तयार करावी लागतील.

Hydroponic Fodder Farming | Agrowon
Okra Cultivation | Agrowon
आणखी पाहा