Pune News : राज्यात मागणी असलेल्या विशिष्ट वाणाचा तुटवडा निर्माण झाला आहे. आपल्या पसंतीचे वाण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यासाठी अकोला जिल्ह्यात दररोज बियाणे मिळविण्यासाठी शेतकरी रांगा लावत आहेत. तर खानदेश, लातूर, अमरावती भागांत बियाणे तुटवडा आणि जादा दराने विक्री केली जात असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
प्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी ‘रास्ता रोको’ केला आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.
शेतकऱ्यांच्या पसंतीच्या बियाणे व खतांचा काळाबाजार सुरू केला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी बियाणे, खते यांची लिंकिंग केली जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या जात आहेत. मात्र कृषी विभाग हातावर हात ठेवून आहे. प्रसंगी शेतकरी, कृषी निविष्ठा विक्रेत्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. वाणाची एमआरपी ८५० रुपये असताना काळा बाजारात ते तेराशे ते चौदाशे रुपयांना विक्री केली जात आहे.
मध्य प्रदेशातील संबंधित कंपनीने नामांकित वाणासोबतच इतरही वाण वितरकांना पुरवलेले आहेत. वितरक हे वाण विक्रेत्यांना विक्रीसाठी देत आहेत. शेतकरी गरज असलेल्या वाणांची जेव्हा मागणी करतो तेव्हा त्याला एका वाणासोबत दुसरा वाण घेणार असाल तरच देऊ, अशी स्पष्ट अडवणुकीची भाषा वापरली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. तशी निवेदनेही दिल्या जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठ कार्यालयाने धडक कारवाईसत्र राबवायला हवे आहे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
शेतकऱ्यांचा कापूस लागवडीचा कल बघून विक्रेते पसंतीच्या बियाण्यांची कृत्रिम टंचाई करत आहेत. अशा विक्रेत्यांची लॉबी मजबूत असून, लॉबीची बियाण्यांच्या उपलब्धतेवर पकड आहे. काळ्या बाजाराची तक्रार केल्यास पुन्हा खते व कीटकनाशके न देण्याची भाषा केली जात आहे. विक्रेते व कृषी विभागांतील मायाजालात शेतकरी अडकले आहेत.भारत येरणे, शेतकरी, वळसंगी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.