Pune News: राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू झाली. पण राज्यभरात आतापर्यंत केवळ १८५ खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. त्यातच यंदापासून पॉस मशिनद्वारे नोंदणी बंधनकारक केल्याने सर्व्हरच्या अडणीही येत आहेत. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकऱ्यांना तासन् तास रांगेत थांबावे लागत आहे. बाजारात सध्या सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा एक हजार ते बाराशे रुपयांनी कमी आहे. .त्यामुळे शेतकरी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी घाई करत आहेत. परंतु राज्यात ३ नोव्हेंबरपर्यंत २२२ खरेदी केंद्रांना मंजुरी मिळाली असून त्यापैकी १८५ केंद्रे सुरू झाली आहेत. तसेच सरकारने यंदा सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर पॉस मशिनच्या माध्यमातून नोंदणी बंधनकारक केली. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतः उपस्थित राहून अंगठ्याचे ठसे देणे बंधनकारक आहे..Cotton Soybean Procurement: कापूस, सोयाबीन खरेदीच्या गोंधळामुळे शेतकरी अडचणीत.राज्यातील बहुतांश भागांत तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांचा डेटा फेच होण्यास वेळ लागत आहे. काही शेतकऱ्यांच्या अंगठ्यांचे ठसे मशिन घेत नाही. सर्व्हरच्या अडचणी सर्वच भागात आहेत. त्यामुळे नोंदणीचे काम धीम्या गतीने होत आहे. त्यामुळे बाकी काम सोडून दिवस दिवस केंद्रावर रांगेत थांबावे लागत असल्याने खोळंबा होत आहे..केंद्रांवर वेगळ्या रांगा करण्याच्या सूचना‘‘खरेदी केंद्रांवर गर्दी वाढल्याने वयस्कर आणि महिला शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नोडल एजन्सींच्या प्रशासनाने खरेदी केंद्रांना आयडी वाढवून देत नोंदणीला गती दिली आहे. तसेच केंद्रांवर वयस्कर आणि महिला शेतकऱ्यांच्या वेगळ्या रांगा करून त्यांची वेगळी नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’’ असे महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या सूत्राने सांगितले..Soybean MSP Procurement: नोंदणी करताना बायोमेट्रिकचा खोडा.अॅपमधून नोंदणी कराशेतकरी ई समृद्धी अॅपच्या माध्यमातून घरबसल्या सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करू शकतात. सरकारने हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. अॅपच्या माध्यमातून नोंदणी करता माहिती काळजीपूर्वक भरावी. अॅपच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतर खरेदी केंद्रांवर सोयाबीन विकताना पडताळणी केली जाते. तसेच आधार प्रमाणीकरण करून खरेदी केली जाते..नेमक्या अडचणी काय?खरेदी केंद्रांची तुटपुंजी संख्यापॉस मशिनवर नोंदणीतील अडचणींमुळे उशीरअनेकदा प्रयत्न करूनही आधार फेच होण्यात अडचणीशेतकऱ्यांची फार्मर आयडीवरील माहिती फेच होण्यात अडचणीअनेक शेतकऱ्यांचे हाताचे ठसे घेण्यास उशीरफार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांची माहिती भरण्यास लागतो वेळ.गेल्या वर्षी नोंदणीसाठी सात बारा, आठ अ, आधार कार्ड आणि बॅंक पासबुक अनिवार्य होते. यंदा मात्र या कागदपत्रांसोबतच शेतकऱ्यांनी नोंदणी केंद्रावर हजर राहून मशिनवर अंगठा देणे बंधनकारक केले. मग ही नोंदणी ऑनलाईन कशी? ही नोंदणी देखील अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. कागदपत्रे अपलोड होत नाहीत. बऱ्याचदा प्रयत्न करूनही ज्येष्ठ शेतकऱ्यांच्या अंगठ्याची ओळख पटत नाही. शेवटी कोड नंबर पाठवून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. हे सगळं वेळखाऊ आहे. नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांना बसण्याची, पाणी पिण्याची व्यवस्था नाही. स्वच्छतागृह तर खूप दूरची बाब.महारुद्र मंगनाळे, शेतकरी आणि ज्येष्ठ पत्रकार.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.