Pune News: खुल्या बाजारात भाव कमी असल्याने शेतकरी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (सीसीआय) हमीभावाने कापूस विक्री करत आहेत. मात्र, सीसीआयने यंदा खरेदीची हेक्टरी मर्यादा कमी केली आहे. राज्यातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये हेक्टरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत खरेदीची मर्यादा आहे. राज्य सरकारने दिलेल्या उत्पादकतेच्या आधारेच मर्यादा ठरविल्याचे सीसीआयने सांगितले. .सीसीआयने राज्यात १५ ऑक्टोबरपासून कापसाची हमीभावाने खरेदी सुरू केली. खुल्या बाजारात कापसाचा भाव प्रति क्विंटल ६५०० ते ७ हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे शेतकरी सीसीआयला हमीभावाने कापूस विक्री करत आहेत. पण सीसीआयने यंदा कापूस खरेदी करताना हेक्टरी खरेदीची मर्यादा खूप कमी केली आहे. राज्यातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये अगदी १२ ते १५ क्विंटलपर्यंत खरेदीची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या मर्यादेपलीकडे हमीभावाने कापूस विकता येणार नाही..Cotton Soybean Procurement: कापूस, सोयाबीन खरेदीच्या गोंधळामुळे शेतकरी अडचणीत.गेल्या वर्षीपर्यंत सीसीआयकडून खरेदीची मर्यादा ठरवली जात होती. पण यंदा सीसीआयने राज्यातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमधील उत्पादकतेच्या आधारे कापूस खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्याच्या कृषी विभागाकडून जिल्हानिहाय उत्पादकतेची आकडेवारी मागविण्यात आली. या उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार जिल्हानिहाय कापूस खरेदीची मर्यादा देण्यात आली. राज्याच्या कृषी विभागाने सीसीआयला हेक्टरी रुई उत्पादकतेची माहिती दिली. .एक क्विंटल कापसामध्ये सरासरी ०.३३ टक्के रुई गृहीत धरून जिल्हानिहाय उत्पादकतेची मर्यादा ठरविण्यात आली आहे. म्हणजेच अकोला जिल्ह्यात रुईची हेक्टरी उत्पादकता ४.६० क्विंटल आहे. रुई गुणोत्तराने कापसाचा हिशोब काढला तर १३.९४ क्विंटल येते. म्हणजेच अकोला जिल्ह्यात हेक्टरी १३.९४ क्विंटल कापूस खरेदी करणार आहे..Cotton Purchase Limit: हमीभावाने कापूस खरेदीची मर्यादा हटवावी.अकोला जिल्ह्यात हेक्टरी १३.९४ क्विंटल खरेदीची मर्यादा दिली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मते अनेक भागांत हेक्टरी उत्पादन २० ते २९ क्विंटल दरम्यान येत आहे. जालना, अहिल्यानगर, धुळे, जळगाव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी केली आहे..अशी आहे मर्यादाजिल्हा कापूस खरेदी मर्यादा (हेक्टरी, क्विंटलमध्ये)अकोला १३.९४बुलडाणा १३.३३वाशीम १६.६६अमरावती १९.२४यवतमाळ १३वर्धा १७.७८.नागपूर १५.१५चंद्रपूर १५.९०गडचिरोली १४.१५हिंगोली १३परभणी १३.३३नांदेड १३धाराशिव १२.१२लातूर १५.४५.बीड १३.६३जालना १२.१२छत्रपती संभाजीनगर ११.१२अहिल्यानगर ७.५७जळगाव १३.१८नंदूरबार ११.९०धुळे ११.कोणत्या जिल्ह्यात कापसाची हेक्टरी उत्पादकता किती आहे, याची माहिती राज्याच्या कृषी विभागाकडून घेण्यात आली आहे. कृषी विभागाकडून आलेल्या उत्पादकतेच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा देण्यात आली. ललितकुमार गुप्ता, अध्यक्ष, सीसीआय.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.