Pune News : राज्यात एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असून मॉन्सून पूर्व पावसाने देखील हजेरी लावली आहे. यामुळे अकोल्यासह राज्याच्या विविध भागांध्ये सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी कपाशी पिकाच्या लागवडीसाठी लागणाऱ्या दोन बियाणांच्या पाकीटासाठी तासंतास उन्हा तान्हाचं दुकानाबाहेर उभारत आहे. यादरम्यान अकोल्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २८) थेट टिळक रोडवर उतरून रोष व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अकोल्यात सध्या खरिप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी कपाशी पिकाच्या चांगल्या प्रतिच्या बियाणांसाठी जिल्ह्यातील कृषी केंद्रावर जात आहेत. येथे शेतकऱ्यांच्या पहाटेपासूनच रांगा दिसत आहेत.
शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक
अशीच रांगा टिळक रोड येथे असणाऱ्या कृषी केंद्रावर आज होत्या. पण हे केंद्रच न उघडल्याने शेतकऱ्यांच्या पारा चढला. तसेच संतापाचा उद्रेक झाल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत चक्का जाम केला. तसेच ऐन उन्हात उभारून देखील बियाणे मिळत नसल्याने सरकारचा निषेध केला आहे. कृषी केंद्रावर नंबर लागल्यानंतर देखील हातात केवळ दोनच बियाणांचे पाकिटं ठेवली जात असल्याने देखील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड राग आहे. यावरून जिल्ह्याभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी टिळक रस्त्यावर चक्का जाम केला.
शेतकरी आक्रमक
यावेळी बियाणांचा तुटवडा निर्माण करून जिल्ह्यात काळा बाजार सुरू असून बियाणे दुप्पट दराने विकली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यावेळी रस्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांची समजूत पोलीस आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढली. मात्र शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.
वडेट्टीवार यांची जोरदार टीका
दरम्यान अकोल्यात जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात आलेल्या कलम १४४ वरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली होती. वडेट्टीवार यांनी, जिल्ह्यात उन्हाच्या तिव्रतेमुळे प्रशासनाने कलम १४४ लागू केला. मात्र शेतकरी उन्हात उभा असलेला यांना कसा दिसला नाही. बियाणे घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना जीवघेण्या उन्हात तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. हे फक्त प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे होत आहे.
तर दोन पाकिट दिल्या जाण्यावरून देखील वडेट्टीवार यांनी टीका करताना, दहा-वीस एकराची शेती असणाऱ्या शेतकऱ्याने या दोन पाकिटांचे काय करायचे असा सवाल केला आहे. अधिकची बियाणे मिळणार नाहीत असे पत्रच कंपनीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. यातून हे अधिकारी दुसऱ्या कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.