Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : मराठवाड्यात टँकरची संख्या सरकली हजारापुढे

Team Agrowon

Chhatrapai Sambhajinagar News : मराठवाड्यात पाणीटंचाईमुळे टँकरची संख्या झपाट्याने वाढत असून, ती आता हजारापुढे गेली आहे. जवळपास ९२४ गाव-वाड्यांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसत असून, त्यांना पाणीपुरवठ्यासाठी १०५८ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. याशिवाय टँकर व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी १४८७ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर व जालना पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातही पाणीटंचाई अधिक तीव्र होत चालली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद व सोयगाव तालुका वगळता ३११ गाव व ४८ वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गंगापूर, वैजापूर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, कन्नड आदी तालुक्यात पाणीटंचाईची अनुक्रमे तीव्रता जाणवते आहे.

ही टंचाई निवारण्यासाठी ४७३ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. त्यापाठोपाठ बदनापूर, जालना, घनसांगवी, अंबड, जाफराबाद व भोकरदन शहरात अनुक्रमे पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे. जिल्ह्यातील २१३ गाव व ५५ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३३६ टँकरची सोय करण्यात आली आहे.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एका गावाला पाणीटंचाईची झळ बसत असून या गावाला एका टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एक गाव व मुखेड तालुक्यातील दोन वाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. बीड जिल्ह्यातील बीड, गेवराई, वडवणी, शिरूर कासार, आष्टी, परळी वैजनाथ व धारूर या तालुक्यांतील १४० गाव व १०५ वाड्यांना अनुक्रमे पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. बीड व गेवराई तालुक्यात टंचाईच्या झळा सर्वाधिक आहेत.

जिल्ह्यातील २४५ गाववाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी १७१ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर तालुक्यातील आठ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आठ टँकरची सोय करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम, कळंब, उमरगा, धाराशिव, वाशी, परंडा, लोहारा आदी तालुक्यांतील ४० गावांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

१४८७ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत टंचाई निवारण्यासाठी १४८७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरीतून टँकर व टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. टँकरला पाणीपुरवठा करण्यासाठी ४९८ तर टँकर व्यतिरिक्त पाणीपुरवठा करण्यासाठी ९८९ विहिरी अधिग्रहित आहेत.

तब्बल १०४२ खासगी टँकर

मराठवाड्यात टंचाईग्रस्त गाव वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी १०५८ टँकरची सोय करण्यात आली आहे. या टँकरपैकी तब्बल १०४२ टँकर खासगी आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये ४७३, जालन्यामध्ये ३२६, परभणी १, नांदेडमधील ३, बीडमधील १६९, लातूरमधील ४, धाराशिवमधील ६६ टँकरचा समावेश आहे. दुसरीकडे केवळ १६ शासकीय टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामध्ये जालन्यातील १०, बीडमधील २, लातूरमधील ४ टँकरचा समावेश आहे.

जिल्हानिहाय अधिग्रहित विहिरींची संख्या

जिल्हा विहिरी

छ.संभाजीनगर २४०

जालना ३१२

परभणी २२

हिंगोली २३

नांदेड ४५

बीड १७०

लातूर १७५

धाराशिव ५००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT