Maharashtra Agriculture: राज्यातील शेतकऱ्यांना गोड ज्वारीच्या माध्यमातून परवडणाऱ्या पिकाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी टाटा केमिकल, पाणी फाउंडेशन आणि सह्याद्री फार्म या तीन संस्थांनी पुढाकार घेतला असून येत्या रब्बी हंगामातच एक हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करून सातारा जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे. राज्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन तर रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका याशिवाय फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. .ही सर्व पारंपरिक पिके उत्पादकांना किफायती ठरताना दिसत नाहीत. अशा वेळी परवडणाऱ्या पिकाचा एक चांगला पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे. मागील दोन-तीन वर्षांपासून गोड ज्वारीच्या पर्यायाबाबत प्रकर्षाने बोलले जात आहे. ऊस टंचाईच्या समस्येवर आता साखर कारखान्याला गोड ज्वारीच्या पर्यायाबाबतचे मत अलीकडे अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे..Jowar Farming: सोलापूर जिल्ह्यात ज्वारीची फक्त ४४ टक्केच पेरणी.शिवाय २०२३ दरम्यान इथेनॉल उत्पादन वाढीसाठी उसात गोड ज्वारीच्या आंतरपिकाचे प्रयोग उत्तर प्रदेशात झाले. परंतु गोड ज्वारीबाबतचे आत्तापर्यंतचे कोणतेच प्रयोग पुढे गेले नाहीत, हे खेदाने स्पष्ट करावे लागते. आपल्या राज्यात जळगाव जिल्ह्यात १९२० च्या दरम्यान खरीप हंगामात कपाशीत आंतरपीक तुरीच्या दोन ओळी पेरल्या जायच्या..त्या ओळीत भड म्हणून चिकनी ज्वारीचे दाणे टाकले जायचे. या ज्वारीचा हुरडा खूपच गुळचट लागायचा व त्या भडाचे ताटेही गोड असल्याने सोलून खाल्ले जात. त्याच काळात या गोड ज्वारीपासून धान्य, चारा याशिवाय इंधन निर्मितीचे काम झाले असते तर आज महाराष्ट्राचे नंदनवन झाले असते, असे यातील जाणकारांना वाटते..Jowar Sowing: ज्वारीची ५९ हजार ५५४ हेक्टरवर पेरणी .गोड ज्वारीवर खऱ्या अर्थाने संशोधनाचे काम सातारा जिल्ह्यातीलच ‘नारी’ या संस्थेत १९६८ दरम्यान अमेरिकेच्या मदतीने सुरू झाले होते. यात प्रामुख्याने धान्य आणि जास्त शर्करा असलेला रस मिळेल, अशा जातीची यशस्वीपणे निर्मिती करण्यात आली. या रसापासून काकवी, गूळ, शिवाय साखर बनविण्याचे प्रयत्न पण झाले. १९८० दरम्यान याच संस्थेत गोड ज्वारीच्या रसापासून मद्यार्क निर्मिती व त्याचा कंदील, स्टोव्हमध्ये वापर यावरही उत्तम काम झाले..पुढे भारत सरकारने २००५ मध्ये गोड धाटाच्या ज्वारीपासून मद्यार्कनिर्मितीचा राष्ट्रीय कार्यक्रम आरंभला. परंतु महाराष्ट्र सरकारच्या उत्पादन शुल्क विभागासह इतरही विभागाच्या मंजुऱ्या, परवान्यामध्ये हा प्रकल्प रखडून राहीला. पुढे इक्रिसॅटसह भारत सरकारच्या संशोधन संस्थांनीही गोड ज्वारीवर संशोधनात्मक काम सुरू केले. परंतु त्याचे नेमके काय झाले, हाच आज संशोधनाचा विषय ठरू शकतो..गोड ज्वारीच्या कणसातून धान्य मिळते. या ज्वारीच्या धाटात उसाप्रमाणेच जास्त साखर साठवली जाते. धाटातून गोड रस मिळतो. या रसाचा उपयोग काकवी, इथेनॉल, मद्यार्कासाठी होतो. रस पिळून राहिलेला चोथा हा जनावरांसाठी उत्तम चारा आहे. चोथ्यापासून कागदही बनवता येतो. थोडक्यात काय तर जमिनीच्या एकाच तुकड्यातून अन्न, इंधन आणि चारा यांची निर्मिती हे पीक करते..गोड ज्वारी हे कोरडवाहू पीक असून उसापेक्षा ४० टक्के कमी पाण्यात येते. शिवाय ते तीन ते चारमाही असल्याने वर्षातून दोन वेळा तरी घेणे शक्य आहे. अशा बहुगुणी पिकाची पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून पुन्हा एकदा व्यवहार्यता तपासताना या पिकात आधी झालेले काम, आणि ते नेमक्या कोणत्या कारणांनी रखडले याचाही आधी अभ्यास या तिन्ही संस्थांनी करायला हवा. असे झाल्यास त्यांचे पुढील काम सोपे होईल, शिवाय प्रकल्प यशस्वी होण्यासाठी देखील हातभार लागेल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.