Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Nira-Karha Irrigation Scheme : नीरा-कऱ्हा उपसा सिंचन योजना करणार

Team Agrowon

Baramati News : बारामती तालुक्यातील जिरायती भागातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी १ हजार २५ कोटी रुपयांची नीरा - कऱ्हा उपसा सिंचन योजना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. ३) दिली.

जळगाव क.प.वि.का. सेवा सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रकाश जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, रणजीत तावरे, जळगाव क.प. वि.का. सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश चव्हाण, उपाध्यक्ष रतनबाई पोंदकुले आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाल्या की, या भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कायमच प्रयत्न करण्यात आले असून अद्यापही त्यावर काम करणे बाकी असल्याने उपसा सिंचन योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत या परिसरातील बहुतांश जिरायती गावे समाविष्ट करण्यात येणार असून सुमारे ४५ हजार एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यात येणार आहे.

या योजनेत ७.५ फूट व्यासाची पाइपलाइन असणार असून त्यात दोन टप्प्यांत २ हजार अश्वशक्तीचे १२ पंप तर २ हजार १५० अश्वशक्तीचे ७ पंपाद्वारे पाणी उचलले जाणार आहे. प्रतिवर्षी या भागात २ टीएमसी पाणी देण्यात येणार असून १ टीएमसी पाणी ३० दिवसांत विहिरी, पाझर तलाव, बंधारे भरण्यासाठी देण्यात येईल. तर १ टीएमसी पाणी उर्वरित ११ महिन्यांसाठी देण्याचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गेल्या पाचपैकी तीन वर्षांत बारामती तालुक्यात रस्ते, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, बसस्थानक, विविध भव्य इमारती आदींसाठी ८ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी दिला आहे. सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देऊन राज्य शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजनेची तीन महिन्यांची रक्कम देण्यात आली असून ऑक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांची रक्कम लवकरच वितरित करण्यात येईल, असे सांगितले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

SCROLL FOR NEXT