Tembhu Irrigation Scheme : दुष्काळग्रस्त भागातील शेतीला ‘टेंभू’चे शाश्‍वत पाणी मिळणार

CM Eknath Shinde : टेंभू उपसा सिंचन विस्तारित योजनेमुळे वंचित गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. त्यामुळे शेतीला शाश्‍वत पाणी उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांचे पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होईल.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सांगली जिल्ह्यातील टेंभू आणि जतच्या म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी निधीची उपलब्धता केली आहे. दुष्काळी भागातील शेती ओलिताखाली येणार आहे. टेंभू उपसा सिंचन विस्तारित योजनेमुळे वंचित गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. त्यामुळे शेतीला शाश्‍वत पाणी उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांचे पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होईल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच टेंभूच्या सहाव्या टप्प्याला अनिल बाबर यांचे नाव देऊ असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

CM Eknath Shinde
Bhagpur Irrigation Scheme : जळगाव जिल्ह्यातील भागपूर सिंचन योजनेस मंत्रिमंडळाची सुधारित मान्यता; ३० हजार हेक्टर जमीन होणार सिंचित

विटा (जि. सांगली) येथील सुळेवाडी येथे टेंभू उपसा सिंचन विस्तारित योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १) झाले. त्यानंतर विटा येथे आयोजित व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, आमदार शहाजी पाटील, खासदार धैर्यशील माने, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास बाबर, अमोल बाबर, शेतकरी उपस्थित होते.

CM Eknath Shinde
Tembhu Irrigation Project : माण, खटावसह सांगोल्याला मिळणार एक टीएमसी पाणी

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की स्व. अनिलभाऊंनी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही. त्यांचा योजना पूर्ण करण्यासाठी ध्यास होता. ही योजना पूर्णत्वासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. टेंभू सिंचन योजनेमुळे या भागातील शेती सिंचनाखाली आली आहे. भाऊ असायला हवे होते, त्यांची उणीव भासते. लोकाभिमुख लोकनेता कसा असावा हे अनिल बाबर यांनी राज्य व देशाला दाखवून दिले. टेंभू सिंचनासाठी ७३७० कोटी आणि जतसाठी म्हैसाळ विस्तारीत योजनेसाठी २००० कोटी निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे शेतीचा पाणीप्रश्‍न मार्गी लागणार आहे.

बाबर कुटुंबीयांच्या मागे मी उभा : श्री. शिंदे

सुहास बाबर व त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे मी उभा आहे. जनता हा माझा परिवार आहे. त्यामुळे सुहास यांच्यात कधीही आणि कुठेही अंतर पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com