Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : ‘कासारी’ची पातळी खालावली

Irrigation Department : यवलूज-पोर्ले (ता. पन्हाळा) दरम्यान कासारी नदीवरील बंधाऱ्याचे पाटबंधारे विभागाने बरगे अद्याप न घातल्यामुळे नदीचे पात्र जागोजागी कोरडे पडू लागले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : यवलूज-पोर्ले (ता. पन्हाळा) दरम्यान कासारी नदीवरील बंधाऱ्याचे पाटबंधारे विभागाने बरगे अद्याप न घातल्यामुळे नदीचे पात्र जागोजागी कोरडे पडू लागले आहे. यामुळे कृषी पंपाने पाणी उपसा करताना अडचणी येत आहेत.

परिणामी या बंधारा लाभ क्षेत्रातील चौदा गावांत ऐन रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासू लागली आहे. पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याचे बरगे त्वरित घालावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

साठ वर्षांपूर्वी चौदा गावांच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी तत्त्‍वावर कासारीवर या बंधाऱ्याची निर्मिती केली होती. मात्र कालांतराने हा बंधारा पाटंधारे विभागाकडे वर्ग झाला. या नदीवरील हा शेवटचा बंधारा असून सिंचन क्षेत्रसुद्धा जास्त आहे.

पावसाळा संपल्यानंतर या बंधाऱ्यात पाणी अडवून या पाण्याचा उपयोग यवलूज, पडळ, सातार्डे, माजगाव, पोर्ले, खोतवाडी, देवठाणे, शिंदेवाडी, माळवाडी, उत्रे, पिंपळे, आळवे, वाघवे, गोलिवडे आदी चौदा गावांच्या शेतीसह पिण्यासाठी होत असतो.

सर्वसाधारणपणे पावसाळा संपल्यानंतर पाटबंधारे विभागाकडून या बंधाऱ्यात बरगे घालून पाणी अडवले जाते. परंतु पाटबंधारे विभागाने अद्याप या बंधाऱ्यात बरगे घातलेले नाहीत. परिणामी यवलूज ते देवठाणेपर्यंत कासारीचे पात्र जागोजागी कोरडे पडून सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासू लागली आहे.

या नदीवरील सर्वच बंधाऱ्यांचे बरगे टप्‍प्याटप्‍प्याने घालण्याचे काम सुरू आहे. चार दिवसांत यवलूज-पोर्ले बंधाऱ्यात अडकलेली झाडे-झुडपे व पालापाचोळा स्वच्छ करून या ठिकाणी बरगे घालणार आहे.
- वैजनाथ स्वामी, शाखा अभियंता पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT