Water Storage
Water Storage Agrowon

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

Water Stock : यंदा सरासरीपेक्षा पाऊस झाला. त्यानंतर परतीच्या, मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांत ६ हजार २६७ दशलक्ष घनफूट म्हणजे ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे.
Published on

Sangli News : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा पाऊस झाला. त्यानंतर परतीच्या, मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. यामुळे जिल्ह्यातील ८३ प्रकल्पांत ६ हजार २६७ दशलक्ष घनफूट म्हणजे ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. ८३ पैकी ५६ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. या वर्षी उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात ५ मध्यम व ७८ लघू अशी एकूण ८३ प्रकल्प संख्या आहे. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ९ हजार ४४० दशलक्ष घनफूट आहे. गेल्यावर्षी पावसाने दडी मारली त्यामुळे प्रकल्पात पाणीसाठा कमी झाला होता. गतवर्षी ऑक्टोबरअखेर २ हजार ७१५ दशलक्ष घनफूट म्हणजे ३५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाणीटंचाई निर्माण झाली होती.

Water Storage
Water Storage : खानदेशात जलसाठा ८६ टक्क्यांवर

यंदा जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत सरारीपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यानंतर पावसाने काहीशी उघडीप दिली होती. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यातही पाऊस झाला. या पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरअखेर ८३ प्रकल्पांत ६ हजार २६७ दशलक्ष घनफूट म्हणजे ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Water Storage
Water Storage : जलसाठा स्थिर; अनेक नद्या अद्याप प्रवाही

जिल्ह्यातील ८३ पैकी ५६ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तर नऊ प्रकल्पात ७५ टक्के, पाच प्रकल्पांमध्ये ७५ ते ५० टक्के, तर चार प्रकल्पांत २५ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. तीन प्रकल्प कोरडे असून ६ प्रकल्पांत मृत पाणीसाठा शिल्लक आहे. हे प्रकल्प जत तालुक्यातील आहेत.

खानापूर, तासगाव, आटपाडी, जत आणि कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यांतील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जत तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे १५ प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. यंदा प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असल्याने उन्हाळ्यापर्यंत पाणी पुरेल असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com