Jalgaon News : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा स्थिर असून, हा साठा सुमारे ८६ टक्के एवढा आहे. गिरणा धरणातील साठा १०० टक्के एवढा आहे. जलसाठा स्थिर असल्याने पुढे टंचाई राहणार नाही, अशी स्थिती आहे.
या महिन्यातही चांगला पाऊस सुरवातीला झाला. पिकांची हानी झाली, पण पाणी यंदा मुबलक आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी सतत आहे. आता रब्बीसाठी शेतकऱ्यांना थंडीची प्रतीक्षा आहे. भुसावळ (जि.जळगाव) येथील तापी नदीवरील हतनूर धरणासह गिरणा, वाघूर प्रकल्पातील जलसाठा यंदा मुबलक आहे.
काही दिवसांपूर्वी तापी नदीला प्रवाही पाणी हतनूरमधून पाणी नदीत सोडले होते. नदी प्रवाही आहे. गिरणा नदीतही पाणी आहे. खानदेशात धुळ्यातील पांझरा, अनेर, नंदुरबारातील गोमाई, उदय, सुसरी, जळगावात कांग, अंजनी, सुकी, भोकर , वाघूर आदी नद्यांना प्रवाही पाणी आहे. यामुळे टंचाई दूर झाली आहे.
तसेच गिरणा नदीवरील गिरणा धरणातील साठा स्थिर आहे. मागील वेळेस या धरणात ५६ टक्के जलसाठा सप्टेंबरअखेर होता. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांमधील अनेक गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी गिरणा धरणातून पाणी यंदाही मिळणार आहे.
रब्बीत २१ हजार हेक्टरला गिरणा धरणाचा लाभ मिळतो. या धरणातून तीनदा नदीत पाणी सोडले जाणार आहे. धरणाची साठवण क्षमता १८ टक्के एवढी आहे. गिरणा धरणातील पाण्याचा चांगला लाभ गिरणा काठच्या गावांना झाला आहे.
हतनूर (ता.भुसावळ) धरणातील जलसाठा धरणात यंदाही जलसाठा १०० टक्के आहे. त्यातून रब्बीला तीन वेळेस पाणी देण्यात येईल. दीपनगर (ता.भुसावळ) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव (ता.भुसावळ) येथील आयुध निर्माणी, भुसावळ शहर, जळगाव येथील औद्योगिक वसाहत व नदीकाठच्या सुमारे १० गावांमधील टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले जाते.
या धरणांत ५४ टक्के गाळ असल्याने जलसाठा झपाट्याने घटतो. हतनूरमधून तीनदा रब्बीसाठी आवर्तन सुटणार आहे. तसेच जामनेरातील वाघूर धरणाची साठवण क्षमता आठ टीएमसी आहे. यातही सुमारे १०० टक्के जलसाठा आहे.
पाणीसाठा स्थिती अशी...
जळगाव जिल्ह्यातील अंजनी, तोंडापूर, अभोडा, मंगरूळ, सुकी, मोर, अग्नावती, मन्याड, बोरी या धरणातील साठाही मिळून ९० टक्क्यांपर्यंत आहे. धुळ्यातील अनेर, पांझरा, अमरावती, सोनवद, बुराई या प्रकल्पातील साठाही मुबलक आहे. नंदुरबारातील दरा,चिरडे, सुसरी, देहली प्रकल्पात जलसाठा मुबलक आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.