Kolhapur Zilla Sahakari Dudh Utpadak Sangh Ltd agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk : ‘गोकुळ’ देणार जातिवंत दुधाळ म्हशीसह तीस हजारांचे अनुदान

Gokul Cooperative Milk Producers : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पुढाकारातून केर्लीमध्ये जातिवंत म्हैस विक्री केंद्र सुरू झाले आहे.

Team Agrowon

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पुढाकारातून केर्लीमध्ये जातिवंत म्हैस विक्री केंद्र सुरू झाले आहे. ‘गोकुळ’चे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्‍घाटन झाले. या म्हैस विक्री केंद्रावर खरेदी केलेल्या म्हशींसाठी ‘गोकुळ’मार्फत ३० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

गोकुळ व एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या या केंद्रात जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा, जाफराबादी म्हशी शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

श्री. डोंगळे म्हणाले, ‘केर्लीतील केंद्रातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत, दुधाळ व सशक्त म्हशी उपलब्ध होणार असून यामुळे म्हैस दूध उत्पादनवाढीसाठी निश्चितच चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी संघ नियमानुसार आपल्या पसंतीनुसार स्व:जबाबदारीने दुधाची खात्री करूनच या केंद्रातून म्हशी खरेदी कराव्यात व उत्तम व्यवस्थापनाद्वारे त्यांचे संगोपन करावे.

म्हैस विक्री केंद्रामध्ये खरेदी केलेल्या म्हशीसाठी गोकुळमार्फत तीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यापैकी आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये अनुदान प्रस्ताव सादर केल्यानंतर तत्काळ देण्यात येईल, असे चेअरमन डोंगळे यांनी सांगितले. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले, ‘जातिवंत म्हैस विक्री केंद्रामुळे गोकुळच्या दूध उत्पादकांना परराज्यातील जनावरे खरेदीसाठी येणाऱ्या अडीअडचणी कमी होणार असून खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

या कार्यक्रमावेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादक राणी कोंडीराम पोवार, प्रतिमा दूध संस्था (निटवडे), बाबासो केरबा दिवसे, नागनाथ दूध संस्था (नागदेववाडी), बळीराम पांडुरंग साळोखे, पंचगंगा दूध संस्था (आंबेवाडी), नवनाथ केरबा गुडाळे, जखनाई दूध संस्था (राशिवडे बुद्रुक), हरीश भिकाजी दळवी, धरमीमाई दूध संस्था (गवसे पैकी पाटीलवाडी), बाबू व्यंकू कागणकर, विठ्ठल दूध संस्था (तावरेवाडी) यांचा सत्कार करण्यात आला.

गोकुळ’चे संचालक बाबासाहेब चौगले यांनी प्रास्ताविक केले. एनडीडीबी मुंबईचे जनरल मॅनेजर डॉ. शिवकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी आभार मानले. संचालक अभिजित तायशेटे, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका अंजना रेडेकर, योगेश गोडबोले, डॉ. महंमद तारिक, डॉ. उदयकुमार मोगले, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. साळुंखे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

Delhi University Election: शितावरून भाताची परीक्षा

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

SCROLL FOR NEXT