Gokul Milk Subsidy : दूधसंस्थांच्या इमारत बांधकामास 'गोकुळ'कडून मिळणार अनुदान

Kolhapur Gokul Milk Sangh : ‘जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सहा हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांनाच्या माध्यमातून सुमारे १६ लाख लिटर प्रतिदिन संकलन होते.
Gokul milk
Gokul MilkAgrowon

Kolhapur Jilha Dudh Sangh : दूध संस्था इमारत बांधकाम अनुदानात जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) दहा ते पंधरा हजार रुपयांची वाढ केली आहे. दूध संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी हा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

गोकुळला प्रतिदिन १ ते ४०० लिटरपर्यंत दूध पुरवठा करणाऱ्या संस्थेस १० हजार व प्रतिदिन ५०१ लिटरच्या पुढील दूध पुरवठा करीत असलेल्या संस्थेत १५ हजार रुपयांची वाढ केली आहे. हे अनुदान एक जुलै २०२४ पासून लागू केल्याची माहिती अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली.

डोंगळे म्हणाले, ‘जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सहा हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून सुमारे १६ लाख लिटर प्रतिदिन संकलन होते. दूध संस्था इमारत बांधकाम अनुदान १९९० पासून सुरू केले. आतापर्यंत ९१५ प्राथमिक दूध संस्थांना दोन कोटी ३८ लाख ३० हजार रुपये इतके अनुदान दिले आहे.

Gokul milk
Gokul Milk Sangh : अमेरिकेतील संस्थांची गोकुळला मदत, म्हशींचे दूध वाढविण्यासाठी २०० गावांना होणार फायदा

या योजनेमध्ये ज्या गोकुळ संलग्न प्राथमिक दूध संस्था नवीन इमारत, जुनी इमारत खरेदी अथवा दुसरा मजला व स्वमालकीच्या इमारत शेजारी बांधकाम केल्यास अशा संस्थांना प्रोत्साहनपर अनुदान संकलनानुसार दिले जाते. बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळे मागणी वाढली होती. त्यानुसार अनुदानाच्‍या रकमेत वाढ केली असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली.

असे आहे अनुदान

१ ते १०० लिटर दूध पुरवठा संस्था - ३२ हजार

१०१ ते २०० लिटर दूध पुरवठा संस्था - ३७ हजार

२०१ ते ३०० लिटर दूध पुरवठा संस्था - ४० हजार

३०१ ते ५०० लिटर दूध पुरवठा संस्था - ४५ हजार

५०१ लिटर दूध पुरवठा संस्था - ५० हजार रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com