Flood Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Flood Condition : पूर ओसरू लागला

Heavy Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश नद्यांचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. शिवारे मोकळी होतील तशी कुजणारी पिके दुर्गंधी आणत आहेत.

Team Agrowon

Kolhapur / Sangli News : कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश नद्यांचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. शिवारे मोकळी होतील तशी कुजणारी पिके दुर्गंधी आणत आहेत. यामुळे शिवारात फिरणेही मुष्कील बनले आहे. पंधरा दिवस पाणी शेतात राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, जिल्‍ह्याच्या पश्‍चिम भागात थांबून थांबून पावसाच्या सरी येत असल्या तरी पूर्व भागात मात्र पावसाने पूर्ण विश्रांती घेतली आहे. मंगळवारी (ता.६) विविध धरणांच्या विसर्गात केलेली घट बुधवारी (ता.७) दुपारी चार वाजेपर्यंत कायम होती. आता पंचगंगा नदीचे पाणी इशारा पातळीच्या खाली गेल्याने रस्ते व बंधारे बऱ्यापैकी मोकळे होत आहेत.

पाणी ओसरत असले तरी कोणत्याही नदीचे पाणी अद्यापही पात्रात गेलेले नाही. अनेक शिवारे अजूनही पाण्याखालीच आहेत. पाणी ओसरल्यानंतर कृषी विभागाच्या वतीने पंचनाम्‍यास सुरुवात करण्‍यात आली आहे.

कोयना व वारणा धरणांतून पाणी सोडण्याचे प्रमाण कमी झाल्याने कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत धीम्या गतीने घट कायम आहे. राधानगरी धरणात ८.३२ टीएमसी पाणीसाठा आहे. बुधवारी सकाळी ७ वाजता राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. ६ खुला असून धरणाच्या विद्युत गृहातून १५०० व सांडव्यातून १४२८ क्युसेक असा एकूण २९२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. विविध नद्यांवरील एकूण ४६ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ८ हजार ७३९ हेक्टर जमिनीचे नुकसान

Grape Crop Damage : नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे करा

Shepherds Migration : पूर्व खानदेशात मेंढपाळ बांधव दाखल

Banana Crop Insurance : केळी पीकविमा परताव्यांचा घोळ कायम

Crop Loan : कर्ज वितरणात जिल्हा बँकांची आघाडी

SCROLL FOR NEXT