Kolhapur Flood : शिरोळ तालुक्यात पंधरा दिवसांपासून पूरस्थिती

Crop Damage Due to Heavy Rain in Kolhapur : कोयना धरणातून सुरू असणारा सततचा विसर्ग व अलमट्टी धरणातून कमी करण्यात आलेल्या विसर्गामुळे विशेष करून शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम आहे.
Kolhapur Flood
Kolhapur Flood Agrowon
Published on
Updated on

Kolhapur / Sangli / Satara News : कोयना धरणातून सुरू असणारा सततचा विसर्ग व अलमट्टी धरणातून कमी करण्यात आलेल्या विसर्गामुळे विशेष करून शिरोळ तालुक्यात पूरस्थिती कायम आहे. १६ हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

सुमारे १० हजार नागरिक स्थलांतरित झाले आहेत. तीन हजारांहून अधिक जनावरे स्थलांतरित केली आहेत. शिवारे पाण्याखाली असल्याने येत्या काही दिवसात चारा टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.

शिरोळ तालुक्यात २३ जुलैला आलेला पूर महापुरात विस्तारला. धरण पाणलोट क्षेत्राबरोबर सर्वत्र होत असलेल्या पावसामुळे नद्यांचे पाणी उतरायला नाव घेत नाही. अशी परिस्थिती असताना कोयना, चांदोली, काळम्मावाडी, राधानगरी यासह अन्य धरणांतून विसर्ग सुरूच आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणातून ३ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Kolhapur Flood
Kolhapur Flood : पाण्यामुळे पिके कुजू लागली

१२ दिवसांपासून सर्व तालुक्यांची घडी विस्कटली असून अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे. पंचगंगा नदीचे पाणीही अतिशय मंद गतीने उतरत आहे. रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अजूनही इशारा पातळीच्या वर म्हणजे ४१.४ फुटावर आहे.

दूधगंगा, वेदगंगा नद्यांची वाढ मात्र अद्याप कायम आहे. कृष्णेच्या पातळीत अगदी नाममात्र म्हणजे दिवसाला केवळ एक इंच इतकीच घट सुरू आहे. शिरोळ तालुक्याला पुराचा वेढा आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.

Kolhapur Flood
Monsoon Rain : जुलैअखेर सरासरीपेक्षा ३९ टक्के अधिक पाऊस

कोयनेतून ५२,२०० क्युसेक विसर्ग कायम

कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने विसर्ग कायम आहे. पावसाने धरणात प्रतिसेकंद ४४,७४९ क्युसेक आवक होत आहे. धरणाच्या सांडव्यातून ५०,००० व पायथा वीज गृहातून २१०० असा एकूण ५२,१०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. यामुळे कोयना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. धरणात रविवारी सकाळी आठ वाजता ८६.२८ टीएमसी (८२.१७ टक्के) एकूण पाणीसाठा झाला आहे.

‘अलमट्टी’तून विसर्ग घटवला

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी झाला असला तरी अलमट्टीत पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग ५० हजार क्युसेकने कमी केला आहे. सध्या धरणातून अडीच लाख क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.

अलमट्टीत शनिवारी (ता. ३) सकाळपासून धरणात पाण्याची आवक ३ लाख १९ हजार ९१६ क्युसेकने होती. रविवार (ता.४) ३ लाख १३ हजार ३८७ क्युसेकने धरणात पाण्याची आवक सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com