Crop Damage Flood
Crop Damage Floodagrowon

Crop Damage Flood : कागल तालुक्यात नदीकाठाची दोन हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

Soybean Crop Damage : सोयाबीन, भात, भुईमूग पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे, तर १८०० हेक्टरवरील ऊस पीक पाण्यात बुडले आहे.
Published on

Sugarcane Crop Damage : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या १० दिवसांहून अधिक काळ महापुराचे पाणी शेतात राहिल्याने अनेक पिके कुजून जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील असेच चित्र पहायला मिळत आहे. कागल तालुक्यातील वेदगंगा व दूधगंगा नद्यांना आलेल्या महापुरात दोन्ही नदीकाठावरील सुमारे दोन हजार हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे.

सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रावर असणाऱ्या सोयाबीन, भात, भुईमूग पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे, तर १८०० हेक्टरवरील ऊस पीक पाण्यात बुडले आहे. सर्वच पिकांचा अक्षरशः चिखल झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. पिकांचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

वेदगंगा नदीकाठावरील १७ गावांतील, तर दूधगंगा नदीकाठावरील १६ गावांतील नदीकाठची पिके बुडाली आहेत. नदीकाठावरील सुमारे दोन हजार हेक्टरवरील भात, सोयाबीन, ऊस पीक धोक्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक १८०० हेक्टरवरील ऊस पीक पाण्याखाली बुडाल्याचा प्राथमिक अंदाज कागल तालुका कृषी कार्यालयाने व्यक्त केला आहे.

नदीकाठावरील भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके कुजू लागली आहेत. पूर ओसरण्यास अंदाजे आठ दिवस लागतील. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन शासनाने नदीकाठावरील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १५ ऑगस्टनंतरच पंचनामे सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कागल तालुक्याच्या कृषी अधिकारी यशोदीप पोळ म्हणाले की, कागल तालुक्यातील वेदगंगा व दूधगंगा नद्यांना आलेल्या महापुरात नदीकाठावरील ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग पिके पाण्याखाली गली आहे. सुमारे दोन हजार हेक्टरवरील क्षेत्र पूरबाधित आहे. यामध्ये १८०० हेक्टरवर ऊस आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पूर ओसरल्यानंतर तत्काळ पंचनामे केले जातील.

Crop Damage Flood
Kolhapur Flood : राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे झाले बंद, आलमट्टीचा विसर्ग केला कमी, पाणी पातळीत इंचाइंचाने घट

ऊस हे पुराच्या पाण्यात तग धरून राहणारे पीक आहे. परंतु जवळपास पंधरा दिवसांपासून पाण्यात राहिल्याने उसाच्या सुळीत पाणी गेल्याने कुजल्याने उत्पादकता मोठ्या प्रमाणात घटणार आहे. भात, सोयाबीन, भुईमूग पिके कुजण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकापासून मिळणारे उत्पन्न तर मिळणार नाहीच, शिवाय केलेला उत्पादन खर्चही वाया जाणार आहे. त्यामुळे पुढच्या गळीत हंगामात कारखान्यांना उसाची टंचाई भासण्याबरोबरच शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावरील यमगर्णी, बस्तवडे, बानगे येथील पुलांना मोठ्या प्रमाणात घातलेल्या भरावामुळे नदीकाठावरील शेतीत पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात पसरले आहे. याचा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे वेदगंगा नदीकाठावरील शेतकरी ‘भराव हटाव, शेती बचाव’ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com