Dharashiv News : सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश्य पावसामुळे जिल्ह्यातील ४१० गावांतील ३२ हजार ५२५ शेतकऱ्यांची ८ हजार ५२९ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे शेतात वाहून आलेल्या वाळू, मातीचा थर साचून ७३८ शेतकऱ्यांच्या २१८ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. असे एकूण ८ हजार ७३९.४५ हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून त्यासाठी शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना एकूण ४० कोटी ४८ लाख २ हजार ३५० रुपयांची मदत मिळणे अपेक्षित आहे..अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जमिनींचे अतोनात नुकसान झालेले आहे. खरडून गेलेल्या जमिनीसाठी राज्य सरकारने प्रति हेक्टरी ४७ हजार रुपयांची, तर जमिनीवर मातीचा, वाळूचा तीन इंचापर्यंतचा थर साचला असल्यास त्यासाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, ही मदत केवळ अत्यल्प आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. .Rain Crop Damage : शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान.दरम्यान, तीन हेक्टर मर्यादेपर्यंत वाढीव क्षेत्र व वाढीव निधीची मागणी सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.धाराशिव तालुक्यातील ३३ गावांतील १ हजार ४८१ शेतकऱ्यांची १७३.७५ हेक्टर जमीन खरडून गेली आहे. .तसेच तुळजापूर तालुक्यातील ५८ गावांतील ४७० शेतकऱ्यांची ७४ हेक्टर, उमरगा तालुक्यातील ५१ गावांतील १ हजार ८५७ शेतकऱ्यांची ४३६.११ हेक्टर, लोहारा तालुक्यातील १९ गावांतील ९८७ शेतकऱ्यांची २६३.८० हेक्टर, भूम तालुक्यातील ८५ गावांतील ४ हजार ८६६ शेतकऱ्यांची १ हजार ६७४.६२ हेक्टर, परांडा तालुक्यातील ६१ गावांतील ८ हजार १५३ शेतकऱ्यांची ३ हजार ८५०.१० हेक्टर, कळंब तालुक्यातील ६० गावांतील १२ हजार ४७२ शेतकऱ्यांची १ हजार ५५९ हेक्टर आणि वाशी तालुक्यातील ४३ गावांतील २ हजार २३९ शेतकऱ्यांची ४९७.७७ हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ४० कोटी ८ लाख ७४ हजार ७५० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ३ लाख ५२ हजार हेक्टरला तडाखा .मृत्यू पावलेल्या जनावरांची मदत कधी ?जूनपासून सप्टेंबर अखेरपर्यंत अतिवृष्टीमुळे वाहून जाऊन, पाण्यात बुडून जिल्ह्यातील ३३१ मोठी दुधाळ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. याशिवाय १९० लहान दुधाळ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच ओढकाम करणाऱ्या मोठ्या ३९ तर लहान ३० अशा एकूण ५९० जनावरांचा मृत्यू झाला आहे. .आतापर्यंत यातील केवळ ७८ मोठ्या दुधाळ जनावरांसाठी ३७ लाख, लहान आठ दुधाळ जनावरांसाठी ३२ हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या मोठ्या आठ जनावरांसाठी २ लाख ५६ हजार रुपये, तर लहान ओढकाम करणाऱ्या पाच जनावरांसाठी १ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित जनावरांची मदत कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.तालुका वाळू, गाळ साठलेले क्षेत्रतुळजापूर १० हेक्टरउमरगा २०४.२० हेक्टरभूम ४ हेक्टरबाधित शेतकरी मदत मागणी रक्कम४८ १,८००००६८१ ३६,७५६००९ ७२०००.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.