Moong Urid Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Urid Sowing: खानदेशात उडीद, मूग पेरणी होतेय कमी

Khandesh Agriculture: खानदेशात उडीद व मुगाखालील एकूण क्षेत्र सतत कमी होत आहे. पूर्वी मूग व उडदाखालील एकूण क्षेत्र खानदेशात ५५ ते ५८ हजार हेक्टरपर्यंत असायचे.

Team Agrowon

Jalgaon News: खानदेशात उडीद व मुगाखालील एकूण क्षेत्र सतत कमी होत आहे. पूर्वी मूग व उडदाखालील एकूण क्षेत्र खानदेशात ५५ ते ५८ हजार हेक्टरपर्यंत असायचे. परंतु आजघडीला उडीद, मुगाखालील एकूण क्षेत्र खानदेशात मिळून ३५ हजार हेक्टर एवढेदेखील नसल्याची स्थिती आहे.

उडीद, मुगाची पेरणी खानदेशात पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्ह्यात मुगाची सुमारे १२ हजार हेक्टरवर तर उडदाची १३ हजार हेक्टरवर पेरणी आहे. धुळे व नंदुरबारात मिळून उडदाची सुमारे नऊ हजार हेक्टरवर तर मुगाची सुमारे सात हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. २०२०-२१ मध्ये खानदेशात उडीद व मुगाखाली एकूण क्षेत्र ५५ हजार हेक्टरपर्यंत होते.

एकट्या जळगाव जिल्ह्यात उडदाची सुमारे १९ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. तर मुगाचीदेखील सुमारे १७ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यापूर्वीही उडदाची पेरणी २० ते २१ हजार हेक्टरवर केली जात होती. परंतु पाऊस लांबणे किंवा जूनमधील पावसाचा खंड, अतिपाऊस यामुळे उडीद, मूग पिकांना मागील चार वर्षे सतत फटका बसला आहे.

मागील वर्षी पाऊस अल्प होता. यंदाही काही दिवस पावसाचा खंड होता. यामुळे उडीद, मूग पेरणी होऊ शकली नाही. तसेच अनेकांनी उडीद, मुगाऐवजी मका लागवड केली आहे. शिवाय अतिपावसात उडीद, मूग ही पिके पूर्णतः खराब होतात. त्यांचा चाराही हाती लागत नाही. त्याचे बियाणे महाग आहे. फवारणी व अन्य खर्चही असतो.

उडदाचे पाच किलो बियाणे १४०० ते १८०० रुपयांना मिळते. शिवाय पुढे कापणी व मळणीचा खर्चही मोठा असतो. त्याचे दरही हंगामात कमी असतात. शेतकऱ्यांकडील साठा संपल्यानंतर दरात सुधारणा होते, असा अनुभव शेतकऱ्यांना आहे. यामुळे उडीद व मूग पेरणी खानदेशात कमी झाली आहे. २०२२-२३ मध्ये दुष्काळाचा फटका उडीद, मुगाला बसला.

मक्याकडे वळले शेतकरी

खानदेशात काळ्या कसदार जमिनीत उडीद, मूग पिकाऐवजी सोयाबीन व मका पिकाची लागवड वाढत आहे. यंदा अनेकांनी मका व सोयाबीन लागवड केली आहे. मका पिकात तूर, सोयाबीनमध्ये तूर असे प्रयोगही उडीद व मूग पेरणीऐवजी शेतकऱ्यांनी केले आहेत. मका लागवड खानदेशात दोन लाख हेक्टरपर्यंत आहे. जळगाव जिल्ह्यातील मका लागवड दीड लाख हेक्टरपेक्षा अधिक आहे. हलक्या व मध्यम जमिनीत तूर येत असल्याने तूर लागवड संबंधित भागात झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT