Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Tur Cultivation : मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात तूर लागवड ११ हजार हेक्टर एवढी होती. यंदा धुळे व नंदुरबारातही तूर लागवड बऱ्यापैकी किंवा स्थिरावत असल्याचे दिसल्याचे दिसून येत आहे.
Tur Cultivation
Tur CultivationAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पेरण्या सुरूच आहेत. यात तुरीची लागवड कमी दर व अन्य कारणांनी कमी होईल, असे संकेत होते. पण तूर लागवडीत वाढ दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड १२ हजार हेक्टरपेक्षा अधिक झाली आहे. मागील हंगामात जळगाव जिल्ह्यात तूर लागवड ११ हजार हेक्टर एवढी होती. यंदा धुळे व नंदुरबारातही तूर लागवड बऱ्यापैकी किंवा स्थिरावत असल्याचे दिसल्याचे दिसून येत आहे.

पेरण्या सुरूच असून, पेरण्यांची टक्केवारी ८० पर्यंत आहे. या आठवड्यात पेरण्यांची टक्केवारी ८५ ते ९० पर्यंत पोचेल, अशी स्थिती आहे. सात ते आठ जुलैनंतर पेरण्या अपवादानेच सुरू राहतील. जळगाव जिल्ह्यात सात लाख ४० हजार हेक्टरवर पेरण्या खरिपात होणार आहेत. यातील ८१ टक्के क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धुळ्यात चार लाख आणि नंदुरबारात सुमारे तीन लाख हेक्टरवर पेरण्या अपेक्षित आहेत.

कापूस लागवडीत घट

जळगावसह धुळे, नंदुरबारात कापूस लागवडीत मागील हंगामाच्या तुलनेत घट दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात कापूस लागवड पूर्ण होत आली आहे. मागील हंगामात पाच लाख ११ हजार हेक्टरवर कापूस लागवड जळगावात झाली होती. धुळ्यात सव्वादोन लाख हेक्टरवर आणि नंदुरबारातही सुमारे एक लाख २५ हजार हेक्टरवर कापूस पीक होते. परंतु यंदा तिन्ही जिल्ह्यांत कापूस लागवड घटली आहे.

Tur Cultivation
Kharif Sowing : खरिपाची ५ लाख ११ हजार हेक्टरवर पेरणी

मागील हंगामात खानदेशात साडेआठ लाख हेक्टरवर कापूस पीक होते. यंदा जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख सहा हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे. आणखी दोन ते तीन दिवस कापूस लागवड सुरू राहील. पुढे लागवड थांबेल. यामुळे कापूस पिकाची लागवड खानदेशात यंदा साडेचार लाख हेक्टरवर जेमतेम होईल, अशी स्थिती आहे.

धुळ्यातही सुमारे एक लाख ८० ते ९० हजार हेक्टरवर आणि नंदुरबारात ९५ ते ९८ हजार हेक्टरवर कापूस पिकाची लागवड होऊ शकते. खानदेशातील एकूण लागवड साडेसात लाख हेक्टरवर राहील, असेही संकेत आहेत. खानदेशात कापूस लागवडीत यंदा एक लाख हेक्टरने घट येईल, असा अंदाज आहे.

Tur Cultivation
Kharif Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत १५ लाख ४३ हजार ३७२ हेक्टरवर पेरणी

खानदेशात मका लागवड वाढत आहे. तसेच अनेकांनी कापूस पीक कमी करून तुरीसही पसंती दिली आहे. यामुळे तूर लागवड जळगाव जिल्ह्यात सुमारे १२०० हेक्टरने वाढली आहे. तूर लागवड सुरूच आहे. मका लागवडही सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात मका लागवडीत आतापर्यंत १० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. यंदा मका लागवड जळगाव जिल्ह्यात ३० ते ३५ हजार हेक्टरने वाढेल, असे संकेत आहेत. सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

सोयाबीनही स्थिर

सोयाबीनखालील क्षेत्रही खानदेशात स्थिर आहे. जळगाव जिल्ह्यात १८ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन आहे. या क्षेत्रात किंचित वाढ होऊ शकते. जळगावात उडदासह मुगाची पेरणी कमी दिसत आहे. मुगाची १८ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित होती. पण पेरणी सुमारे नऊ हजार २०० हेक्टरवर झाली आहे. उडदाची १६ हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित होती. पण उडीद पेरणीदेखील सुमारे १० हजार हेक्टरवर झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com