Chh. Sambhajinagar News : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शनिवारी (ता. १६) दोनदिवसीय जुन्या आंबा फळबागांचे पुनरुज्जीवन विषयावर प्रशिक्षणाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, बीड या जिल्ह्यांतील सुमारे ७५ शेतकरी या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. .वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख व केसर आंबा गुणवत्ता केंद्र तसेच फळ संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी व प्रकल्प व्यवस्थापक डॉ. संजय पाटील, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य दिलीप देशमुख आदींच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. प्रास्ताविक डॉ. पाटील यांनी करताना प्रशिक्षण आयोजनामागील भूमिका विशद केली..निर्यातीची सोय व्हावीवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. बेग म्हणाले, की विद्यापीठाने अडीच हजार हेक्टर जमीन वहीत केली. सुमारे १०० हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहे. गावरान आंबे जतन करण्याचा प्रयत्न सुरू असून विशेष संशोधन केंद्र उभे करतो आहे. आंब्याची राजकीय सर नवीन वाण लवकरच प्रसारित होईल. निर्यातीची सोय छत्रपती संभाजी नगरात नाही ती फळ संशोधन केंद्राच्या परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे..Mango Farming : मोहर येण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचे तंत्र.शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रश्न समजून घेतलेजिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर या उपक्रमातून सुमारे १५० अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले सुमारे १७०० शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले. कर्ज प्रकरणाची सोडवणूक करण्यासाठी अर्ज द्या कर्ज घ्या मोहीम राबविली ६०० गावातील कॅम्पमधून सुमारे २०० कोटी कर्ज वितरण केले..रासायनिक खताचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे एक जिल्हा एक उत्पादन यामध्ये हिमरू शाल ऑटोमोटिव्ह पार्ट आणि केसर आंबा यांचा समावेश आहे. केसर आंब्याला जगाच्या पाठीवर घेऊन जायचे आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत आंब्याची संबंधित सर्वांच्या बैठका घेऊन उत्पादन वाढ व शेतकऱ्याच्या पदरात पैसे पडण्यासाठी विक्री व्यवस्थापन निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जाईल..Mango Farming : आंब्याच्या योग्य व्यवस्थानासह मार्केटिंगचाही अभ्यास करा.शेतकरी देवो भव म्हणत काम..कुलगुरू डॉक्टर इंद्र मणी म्हणाले, की शेतकरी आहेत म्हणून कृषी विद्यापीठांना महत्त्व आहे. विद्यापीठ शेतकरी शासन उद्योग या चारही भागांना सोबत घेऊन शेतकरी विकासाचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाची शेतकरी जोडला जावा यासाठी प्रशिक्षण महत्त्वाची ठरतात. फळ संशोधन केंद्राचे सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिक उत्पादन देणारे वाण संशोधित करत असताना हवामान बदलाचे परिणाम अडचणी निर्माण करतात. .बायोमिक्स व इतर घटकाच्या निर्मितीसाठी आणखी सहा प्रयोगशाळा उभारल्या जाणार. जुलैमध्ये बायोमिक्सची विक्रमी विक्री झाली. त्यामुळे या उत्पादनाच्या निर्मितीसाठी आणखी तीन कृषी विज्ञान केंद्र व नांदेड कापूस संशोधन केंद्रात प्रयोगशाळा उभारणार.केंद्र आणि राज्य सरकारकडून आतापर्यंत ७२ कोटींचा निधी विद्यापीठाला मिळाला. स्वच्छ कापूस प्रकल्पातून कापसाचा दर्जा उंचावण्याचा तसेच ड्रोन तंत्रज्ञान विस्तारण्याचा व शिक्षणात कौशल्याला प्राधान्य देण्याचाही प्रयत्न आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.