Akola-Washim DCC Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

Akola-Washim DCC Bank : देशातील पहिली जिल्हा सहकारी बँक दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Indias First DCC Bank : भारतातील पहिली जिल्हा सहकारी बँक म्हणून नावलौकिक असणारी ‘दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ म्हणजे सहकारमहर्षी कै. डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या भगीरथ प्रयत्नांचे यश.

Team Agrowon

The Akola-Washim District Central Cooperative Bank : भारतातील पहिली जिल्हा सहकारी बँक म्हणून नावलौकिक असणारी ‘दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ म्हणजे सहकारमहर्षी कै. डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या भगीरथ प्रयत्नांचे यश.

गेली ११४ वर्षे सातत्याने शेतकरी,  शेती आणि ग्रामीण समाजव्यवस्था सुधारण्यासाठी अविरत झटणारी ‘दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ आज देशातील उत्कृष्ट व सक्षम जिल्हा बँकांच्या यादीत अग्रस्थानी आहे. सहकारक्षेत्रातील 'महाब्रॅंड' असणाऱ्या ‘दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’च्या आजवरच्या वाटचालीचा संक्षिप्त आढावा.

भारतातील पहिली जिल्हा सहकारी बँक म्हणजे, ‘अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक’ असून, देशातील उत्कृष्ट व सक्षम जिल्हा बँकांच्या यादीत ‘अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’ने स्थान पटकावून महाराष्ट्र राज्यातील ‘सहकार’च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.  आज बँकेच्या स्थापनेला ११४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात अनेक वेळा कठीण परिस्थितीवर मात करून हा सन्मान मिळाला आहे. भारतातील पहिली जिल्हा सहकारी बँक म्हणून केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला आहे.

बँकेने जोपासलेली आर्थिक शिस्त, पाळलेले बँकिंग नॉर्म्स व काळानुरूप वेळोवेळी आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला अवलंब यांमुळे बँकेचा लौकिक राज्यात व देशात आहे. बँकेला हा दर्जा प्राप्त करून देण्यात स्थापनेपासून ते आजपर्यंतचे सर्व संचालक मंडळ व अध्यक्षांचे मोलाचे योगदान आहे. मात्र बँकेला कठीण परिस्थितीतून प्रगतिपथावर आणून उंच शिखरावर नेण्यात प्रदीर्घ काळपर्यंत अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे सहकारमहर्षी कै. डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांचे नाव अग्रस्थानी येते.

कापूस उत्पादक चळवळीचे प्रणेते, कृषी, सहकार व शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य नेते, ‘अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’च्या प्रगतीचे शिल्पकार, सहकारीमहर्षी कै. डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांनी सलग ३० वर्षांपर्यंत अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळत, आर्थिक शिस्तीचे व रिझर्व बँकेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत बँकेची जडणघडण मजबूत केली.

बॅकिंगसोबतच सामाजिक दायित्वाची जाणीव असल्याने जिल्ह्यातील भूजलपातळीचा अभ्यास करून शेतकऱ्यांसाठी ‘नो वॉटर नो मनी’ असा ट्युबवेल कंत्राटदारांशी करार करून बँकेमार्फत हा अभिनव प्रकल्प राबवीत सहकाराला नवीन आयाम दिला. संत गाडगे महाराज, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा आदर्श ठेवून या महानुभवांच्या विचारसरणीला अनुसरून आयुष्यभर कार्य करणारे आणि सहकार क्षेत्राच्या चोफैर प्रगतीसाठी झटणारे कै. अण्णासाहेब खऱ्या अर्थाने सहकारातील ‘भगीरथ’ ठरले.

अण्णासाहेबांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान जंगलतोड सत्याग्रह, चलेजाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेत, जेलयात्रासुद्धा केली. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीत सक्रिय भाग घेत, ही चळवळ विदर्भात दूरवर पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सहकार चळवळ अधिक व्यापक आणि सखोल रुजविण्यासाठी बॅकिंग क्षेत्रासोबत इतर क्षेत्रात सहकाराचे बीजारोपण करताना, ‘अकोला जिल्हा सहकारी जीन प्रेस’ची स्थापना केली.

‘अकोला जिल्हा खरेदी विक्री संघ’, तसेच अकोला येथे सहकारी मुद्रणालयाची स्थापना केली. या दोन्ही संस्थांचे अण्णासाहेब संस्थापक-अध्यक्ष होते. महाराष्ट्र सहकारी फर्टिलायझर व केमिकल्स लिमिटेड मुंबई, विदर्भ विभागीय सहकारी बोर्ड, तसेच या दोन्ही संस्थेचे उपाध्यक्षपद भूषवीत  या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी घामाने पिकविलेल्या कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून सहकारमहर्षी अण्णासाहेब यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेतल्याशिवाय सहकाराचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. कापसाच्या प्रश्नाकरिता महाराष्ट्रभर ‘जेलभरो आंदोलन’ करण्यासोबतच महाराष्ट्र कापूस संघाची स्थापना केली. संघाचे संस्थापक-अध्यक्ष म्हणून अनेक प्रश्न मार्गी लावले, उर्वरित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ‘अखिल भारतीय कापूस उत्पादक संघा’ची स्थापना केली.

त्यामुळे त्यांची अखिल भारतीय कृषी काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या कापूस अभ्यासक ‘कोरपे समिती’च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. यासोबतच ‘महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित’ या संस्थेचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी शेतकरी आणि सरकार यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण केले.

गरीब वस्तीतील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उद्देशाने आदर्श विद्यालयाची स्थापना करून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेष व शालेय साहित्य वितरण करण्यात येत होते. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीच्या उपाध्यक्षपदी निवड क्षणाचा दर्जा सुधारण्याकरिता शाळा व महाविद्यालयांना सोईसुविधा पुरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले.

अकोला जिल्ह्यातील पहिल्या आदर्श गृह निर्माण संस्थेची स्थापना करून निर्मिती केलेल्या सदनिका आजही त्यांच्या दूरदृष्टी व कल्पकतेची साक्ष देत आहेत. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीचे अध्यक्ष; नॅशनल को-ऑप. युनियन ऑफ इंडिया; महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक्स असोसिएशन लि., मुंबई; इंडियन फॉर्मर्स फर्टिलायझर को-ऑप लि., नवी दिल्ली; सेंट्रल वेअर हाऊसिंग कार्पोरेशन,

नवी दिल्ली; इंडस्ट्रियल फायनान्स कार्पोरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली; अकोला जिल्हा सहकारी बोर्ड; भारत कृषक समाज, नवी दिल्ली; अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ इत्यादी अनेक संस्थांचे कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. कै. अण्णासाहेब कोरपे यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या अविस्मरणीय कार्याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते मानपत्र, तसेच महाराष्ट्र स्टेट को. ऑप बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईचा प्रतिष्ठीत कै. विष्णुअण्णा पाटील जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

पतव्यवस्थेचा अभाव दूर करून शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील समाजाला सक्षम करण्याच्या उद्देशाने १९०९ मध्ये देशातील पहिली सेंट्रल फायनान्सिंग एजन्सी म्हणून ‘दि अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके’ची स्थापन करण्यात आली. गेल्या ११४ वर्षांच्या कारकिर्दीत बँकेने शेती व शेतकऱ्यांना शिरोभागी ठेवले आहे.

शेतकऱ्यांचा बँकेवरील विश्‍वास, संचालक मंडळावर असलेला भागधारकांचा विश्‍वास आणि संचालक मंडळामध्ये असलेला एकसंघपणा यामुळे कारभार व्यवस्थित सुरू असून, पारदर्शकता ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
- डॉ. संतोषकुमार वामनराव कोरपे,

अध्यक्ष, दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अकोला  

इवलुसा वेलू गेला गगनावरी...
शेतकऱ्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचाविण्याला प्राधान्य देऊन, ग्रामीण विकासाला गती देण्याकरिता कृषी, कृषिपूरक व कृषी औद्योगीकरण यासाठी विविध योजनांची सफलतापूर्वक कार्यपूर्ती करीत शतायुषी झालेल्या जिल्हा बँकेचे प्रथम अध्यक्ष कै. रावबहादूर डी. व्ही. दिगंबर होते. त्यानंतर अनेक मान्यवरांनी बँकेची धुरा समर्थपणे सांभाळली आहे.

माजी सहकारमंत्री स्व. नानासाहेब सपकाळ यांनी १९५४ ते १९५८ या काळात मानद सचिव, तर १९५९ ते १९६५ या काळात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. माजी आमदार स्व. शामराव धोत्रे यांनी १९५८ ते १९६२ या काळात मानद सचिवपदाची धुरा सांभाळली. १९६३ मध्ये कै. डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांनी सतत २७ वर्षे अध्यक्ष या नात्याने अत्यंत सफलतापूर्वक, तसेच कुशलतेने बँकेचे नेतृत्व केले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी व ग्रामीण जनता यांना विविध योजनांच्या माध्यमातून कै. अण्णासाहेब यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या लाभ मिळवून देत बँकेचा पाया मजबूत केला. तदनंतर बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. संतोषकुमार वा. कोरपे यांच्या कुशल नेतृत्वात आज ११४ शाखा कार्यरत असून, जवळपास १३ लाखांच्यावर ग्राहक जुळलेले आहेत. सर्व शाखांचे व्यवहार संगणकीकृत असून, सतत पाच वर्षांपासून बँकेला ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त असून, भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) किमान मर्यादेपेक्षा जास्त राखण्यात यश मिळाले आहे.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांना कै. बापूरावजी देशमुख उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक असोसिएशन लिमिटेड, मुंबईकडून देण्यात आला. नगर अर्बन को-ऑप बँक निवृत्त सेवक संघ, अहमदनगर, यांच्यातर्फे बँकेच्या शतकोत्तर वाटचालीकरिता रावबहादूर गणेश कृष्ण चितळे पुरस्कार देऊन बँकेला दि. २५ नोव्हेंबर २०१८ रोजी सन्मानित करण्यात आले.

सोसायट्यांना आर्थिकदृष्ट्या
सक्षम करण्यास प्राधान्य

l शेतकरी व विविध सोसायट्या यांची सांगड घातल्याशिवाय कृषी विकासाला गती मिळणे जरा अवघड आहे. ही बाब लक्षात घेऊन अध्यक्ष डॉ. संतोषदादा कोरपे यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
l सोसायट्यांचे काम सुचारू पद्धतीने चालविण्यासाठी प्रत्येक सोसायटीच्या पंचकमिटी सदस्यांना वेळोवेळी तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाते.


l प्रत्येक सोसायटीला स्वतःचे कार्यालय बांधण्यासाठी जिल्हा बँकेतर्फे १ लाख रुपये अनुदान आणि उर्वरित रक्कम वाजवी व्याजदरात कर्ज स्वरूपात देण्याची व्यवस्था सुरू ठेवली.
l ठेवींवर घसघशीत व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी १ टक्का जादा व्याज.
l वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे याकरिता फक्त ८ टक्के माफक दराने कर्ज सुविधा

बँकेचा विविध पुरस्कारांनी सन्मान
सन १९९३-९४, १९९५-९६, १९९६-९७, १९९७-९८ असा चार वेळा व सतत तीन वर्षे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईद्वारा ‘वैकुंठभाई मेहता सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ बँकेला प्रदान करण्यात आला.
 बँकेला २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘सहकारनिष्ठ पुरस्कार’ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
 ‘नाबार्ड’च्या ३३ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सन २०१४ मध्ये बँकेला सन्मानित करण्यात आले.
 बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. संतोषकुमार वा. कोरपे यांना बेस्ट चेअरमन म्हणून ‘फ्रंटीयर्स इन को- ऑपरेटिव्ह बँकिंग अवार्ड २०१४’ने सन्मानित करण्यात आले.
 बँकेला ॲसेस डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, जी.आय. झेड. व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयटी अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ आयटी या प्रवर्गाअंतर्गत ‘इनक्लुझिव्ह फायनान्स इंडिया अवार्ड २०१४’ हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबई यांच्याकडून ‘शतकोत्तर वाटचाल विशेष सन्मान’ प्रदान करण्यात आला.
 बँकेला सन २०१५, २०१६ व २०१७ मध्ये उत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून ‘बँको पुरस्कार’ प्राप्त झाला. दि इकॉनॉमिक टाइम्सतर्फे २०१८ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित ६ व्या रूरल स्ट्रॅटेजी समीटमध्ये बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी मार्गदर्शन केल्याबाबत प्रशंसा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
 दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत जीएसटीचा भरणा व विवरणपत्र भरण्याचे कामकाज तत्परतेने केल्याबाबत वित्त मंत्रालयाच्या दि सेंट्रल बोर्ड ऑफ इन्‌डायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टर्मस कन्व्हेन्सद्वारा प्रशंसा प्रमाणपत्र प्रदान.
 जून २०२२ मध्ये आजादी का अमृत महोत्सव पर्वावर भारत सरकार पुरस्कृत सन्मानामध्ये वित्तीय संव्यवहार विवरण मुदतीत, नियमित व अचूक भरल्याबद्दल आयकर विभाग, आयकर निदेशक, नागपूर यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आले.
 नाबार्ड व नॅफस्कॉब यांच्या विद्यमाने सन २०२२ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित ग्रामीण सहकारी बँकेच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते क्रेडिट व बँकिंगमध्ये १०० वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
  महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत जिल्हाधिकारी अकोला यांनी प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले.

दि अकोला-वाशिम जिल्हा  मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आकर्षक योजना

प्रदूषणमुक्त ऊर्जानिर्मितीसाठी
५.८ टक्के दराने
सोलरकर्ज

जलसिंचन

जलसमृद्ध शेतीसाठी
६ टक्के दराने
जलसिंचन कर्ज

वाहनकर्ज

वैयक्तिक-व्यावसायिक वापरासाठीच्या वाहनांकरिता
८.५० टक्के दराने कर्ज

गृह

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी ८ टक्के दराने गृहकर्ज

११४ वर्षांचा इतिहास  
२४ तास सेवा  
सुरक्षित
डिजिटल बँकिंग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT